पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ याज्ञवल्क्यस्मृतेि. नेत्रानें ) ज्ञात वस्तूचें ज्ञान दुसऱ्या ज्ञानेंद्रियाने ( जसें स्पर्शानें ) कसे होऊं शकेल ? १४९ एकदा ऐकलेली वाणी पुनः ऐकून कोण समजतो (ओळखतो )? होऊन गेलेल्या गोष्टीची आठवण कोण ठेवतो ? निद्रावस्थेत गोचर वस्तु कोण करवितो ? १५० जाति ( मी ब्राह्मण वगैरे ), रूप ( मी गोरा आहें वगैरे ), वय ( मी बाल आहे वगैरे ), आचरण (मी अमुक करतों), आणि ज्ञान ( मी ज्ञानी ही बुद्धि ), इत्यादिकांनी अहंकारयुक्त होत्साता शरिराचे द्वारें, मनाचे द्वारें, व वाणीचे द्वारें, शब्दश्रवणादिकांपासून सुखोपभोगाकरितां उद्योग कोण करतो ? १५१ तो आत्मा अज्ञानांत ·बुडालेला असतो, ह्मणून कर्माचा परिणाम होतो किंवा नाहीं अशी त्यास भ्रांति पडते; व तो असिद्ध ( अपूर्ण) असतांही आपणास परिपूर्ण असे मानतो; १५२ आणि भ्रांतीनें माझ्या स्त्रिया, माझे पुत्र, व माझे आप्त, ही माझीं व मी त्यांचा, असें समजतो, व आपणास हित काय व अहित काय यासंबंधानें नेहेमी त्याचा उलट समज होऊन जातो. १५३ आत्मा, व त्रिगुणात्मकप्रकृति, व अहंकारादिसृष्टि यांचा भेद ज्यास कळत नाही. तो पुरुष अन्न सोडून मरण्यास उद्युक्त होतो, अग्नींत देह टाकतो, किंवा पाण्यांत बुडतो. ● १५४ अशा व्यवसायांत राहून आत्मसंयमनाची शक्ति त्यास न राहतां अयोग्य का र्यांचे पाठीमागें लागून आपली कर्में, द्वेष, मोह, व इच्छा यांचे योगानें [ मानुषशरिरांत ] बांधला जातो. १५५ आपल्या आचार्याची उपासना करणे, वेदशास्त्रांत सांगितलेले विषयार्थाचा विचार करणें, तदनुसार धर्मकर्में करणें, सद्गुणी पुरुषांशीं सहवास, योग्यभाषण करण्याचा परिपाठ ठेवणें, स्त्रीकडे अवलोकन किंवा स्त्रीस्पर्श न करणें, सर्व प्राणिमात्रांस आपणाप्रमाणे मानणे, आपले कुटुंबाचा त्याग करणे, काव लावलेली जुनी वस्त्रे धारण करणें, आपल्या इंद्रियांस ज्याचे त्याचे विषयाकडे न जाऊं देणें, तंद्रा व आळस टाकून देणें, शरीर किती क्षीण (नाशिवंत ) आहे याचा खरा निर्णय करणें, आपल्या सर्व व्यवहारांत अशास्त्र कर्म घडूं नये ह्मणून आठवण ठेवणें, रजोगुण व तमोगुण यांचे संबंधापासून मुक्त राहणें, अंतःकरणाचा निर्मळपणा ठेवणें, उदासवृत्ति ठेवणें, व मनाची शांतता राखणे, या उपायांनी शुद्ध होत्साता सात्त्विक- • गुणप्रधानवृत्तीचा पुरुष मुक्त होतो. जगदात्म्याचे स्मरणानें, आत्मध्यानानें, व सत्त्वगुणाचे योगानें [ मानवदेहोत्पत्तीस