पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रायश्चित्ताध्याय. ८५ ज्याला मागील पुढील भान रहात नाहीं, व ज्याचें करणें असंगत असतें, असा तामस पुरुष पशुपक्ष्यादिकांच्या जन्मास जातो. १३९ रजोगुण व तमोगुण यांहीं व्यापलेला प्रतियोनीत गिरक्या खातखात अनिष्ट भावांनीं ( मनोविकारांनीं ) संयुक्त होत्साता आत्मा या जगांत पुन्हा पुन्हा देह धारण 'करतो. १४० आरशावर मळ लागला असतां त्यावर आपले प्रतिबिंब जसें पाहतां येत नाहीं, तद्वत् अपक्क (अपरिपूर्ण ) इंद्रियें ज्याला आहेत अशा आत्म्याला जन्मांतरींचे ज्ञान होऊं शकत नाहीं. १४१ कडु एर्वारु (शेंदाडासारखें एक फळ ) फळांत गोडपणा विद्यमान असूनही तें कच्चें [ सबब ] कडवट असतें, तेव्हां त्यांतील [ गोडी ] जशी लभ्य होत नाहीं, तद्वत् आत्म्याची इंद्रियें अपक्क असतात ( ह्मणजे अपरिपूर्ण असतात ), तेव्हां [ जीवमात्राच्या ] आ-- त्म्याला [ जन्मांतरींचे ] ज्ञानाची योग्यता नाही. १४२ इतर सर्व प्राण्यांस ज्या वेदना (ज्ञान ) समजतात त्या मनुष्याला स्वतःच्या देहाचे द्वारा समजतात. परंतु अहंतादिक बुद्धीपासून मुक्त असलेला योगी पुरुष इंतर प्राण्यांस वेदना होतात त्या योगाचे द्वाराने समजतो. १४३ आकाश एकत्र असून निरनिराळे भांड्यांत जसें निरनिराळें भासतें, किंवा सूर्य एकच असून निरनिराळे डोहांत जसा निरनिराळा दिसतो, तसा आत्मा एक असतांही अनेकांसारखा विभक्त भासतो. १४४ आत्मा, आकाश, वायु, अग्नि, पाणी, आणि पृथ्वी यांस धातु ( पदार्थमात्राचे कायमचे घटकावयव ) ही संज्ञा आहे. हीं ( ह्मणजे शेवटची पांच) इंद्रियग्राह्यविषय - 1. मूलतत्वें होत, व आत्मा अनिद्रियग्राह्यस्वरूप तत्त्व होय. यांचे [ उभयतांचे संयोगा- ] पासून स्थिर व चर वस्तुमात्र झालेले आहे. १४५ मृत्तिका, दंड आणि चक्र यांचे संयोगानें कुंभार जो मडकें घडतो, किंवा कारागीर गवत, माती, व लांकूड यांचे साहाय्याचे ( संयोगानें ) जसें घर तयार करतो; १४६ अथवा एकट्या सोन्याचाच किंवा रुप्याचाच एकादा दागिना सोनार जसा तयार करतो; किंवा रेशीम उत्पन्न करणारा कीटक आपल्याच शरिरांतील लाळेनें आपलें कोश ( राहण्याचें घर ) तयार करतो; १४७ तसा जगदात्मा पंचमहाभूतांशी संयुक्त होऊन निरनिराळे प्राण्यांचे योनींत निर- निराळे स्वरूपांनी आपणासच आपण उत्पन्न करतो. १४८ महाभूतें जशी सत्य तसाच आत्माही सत्य ( ह्मणजे कायमचा नाश कधीही न पावणारा ). [ पंचभूतांहून भिन्न ] आत्मा सत्य नसेल तर एका ज्ञानेंद्रियानें ( जसें