पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/४००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ याज्ञवल्क्यस्मृति. " असे आहे तर " हे ब्रह्मर्षे, याज्ञवल्क्यमुनि, “ तो जगदात्मा नीच योनीत कसा जन्म घेतो, तो सर्व शक्तिमान् असतां अशा नीच वासना करणारा कां होतो; १२९ सर्वेद्रियविशिष्ट होत्साता पूर्वीच्या स्थितीचें ज्ञान त्याला कसें रहात नाहीं; सर्व वस्तुमात्राला व्यापून राहिलेला असतां सर्व प्राणिमात्रांच्या वेदना (सुखदुःखादिक ) त्याला कशा समजत नाहीत' [ असे श्रवण करणारे इतर ऋषि याज्ञवल्क्यास ह्मणाले ]. " १३० मन, वाचा, व शरीर यांच्या कर्मापासून उत्पन्न झालेल्या दोषांनी आत्मा हा अंत्याच्या (नीचजातिमनुष्याच्या ) देहरूपानें, पक्ष्याच्या शरीररूपानें, स्थिर वस्तूच्या स्वरूपानें संसारांतील अनेक योनीला प्राप्त होतो. १३१ ज्या अर्थी प्राणिमात्रांचे देहांत अनंत भाव (ह्मणजे इच्छा, मोह, माया ) असता- त, त्या अर्थी ह्या जगांत सर्व जातींचे प्राण्यांमध्ये निरनिराळे आकार व स्वरूप धारण क रणारे प्राणी आहेत. १३२

कांहीं कर्मांचे परिणाम कर्म करणाराच्या मरणानंतर घडून येतात; कांहीं कर्माचे [ कर्मकर्ता जिवंत असतांच ] ह्या लोकींच घडून येतात; व कांही कर्माचे ह्या जगांत आणि त्यापुढें अशा दोन्ही ठिकाणी घडून येतात. या सर्व परिणामांस कारण ह्मटलें ह्मणजे [ प्राण्यांच्या कर्माचा ] भाव (प्रकार ) हे आहे. १३३ जो दुसऱ्याचें द्रव्य घेण्याचें मनांत आणतो, लोकांचे वाईट व्हावें असें जो इच्छि- तो, आणि जो गोष्टी खोट्या असल्या तथापि आग्रह धरतो, हे सर्व नीच योनींत जन्म पावतात. १३४ असत्य बोलणारा, लोकांची निंदा करणारा, व कठोरभाषणी, हे चतुष्पाद किंवा. पक्षियोनीत जन्मतात. १३५ निरंतर चौर्यकर्मीत निमग्न असलेला, परस्त्रीशी संग करणारा, व शास्त्रोक्त मार्गा- वांचून इतर रीतीने जनावरांची हिंसा करणारा हे स्थावरपदार्थरूपाने निर्माण हो- तात. ज्यास आत्मज्ञान प्राप्त झालेले आहे, जो पवित्र राहतो, ज्याचें अंतःकरण स्थिर झालेले आहे, तपश्चर्या करणारा, ज्यानें आपली इंद्रियें जिंकलेली आहेत, स्वधर्मकर्मे क रणारा, वेदार्थ जाणणारा असा सात्विक पुरुष, देवयोनीप्रत प्राप्त होतो. जो असत्कार्ये करण्यांत नेहेमीं निमग्न राहतो, जो अधीर (अगदी उतावळा ), जो सर्वकाल अनेक कामांत हात घालतो व जो विषयी असा राजस पुरुष मरणानंतर पुनः म नुष्ययोनीत उत्पन्न होतो. जो फार झोंपाळू, क्रूर कर्मे करणारा, ज्यास हेवा असतो, जो नास्तिक, जो याचनाशील,