पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रायश्चित्ताध्याय. ८३ होतो; [परम ] आत्म्यापासून सर्व जगत् उत्पन्न झालेलें आहे, आणि जगतापासून [ जीव ] आत्म्याचा उद्भव (आरंभ ) झालेला आहे, असें हाटलेले आहे. १.१७ [असें हैं धर्मशास्त्र ऐकणारे इतर ऋषि याज्ञवल्क्य ऋषीस ह्मणाले ]:-देव, असुर, व मानव यांहींयुक्त हैं जगत् परमात्म्यापासून कसें उत्पन्न झाले व आत्मा ( जीवात्मा ) त्यांत कसा उत्पन्न झाला हें आह्मांस समजत नाहीं तें सांगा. ११८ [ आपल्या डोळ्यांवरील ] भ्रांतिस्वरूप मोहजाल दूर केल्यानंतर सहस्र हातांचा, सहस्र पायांचा, व सहस्र नेत्रांचा, सूर्याप्रमाणें जो तेजःपुंज, व सहस्र शिरांचा जो पुरुष दिसतो, ११९ तो जगदात्मा होय. तोच यज्ञादिकांची [ आराध्यदेवता ], सर्वव्यापक तोच, उत्पादक तोच, विराज आणि [ पुरोडाशादि ] अन्नाचे स्वरूपानें यज्ञस्वरूप होतो तो तोच. १२० देवतांस आहुति ह्मणून अर्पित करण्याचें तें ज्या रसरूपानें दिलें जातें तो रस, देवतांची तृप्ति करून व यज्ञकर्त्याच्या इच्छा परिपूर्ण करून पुढें, १२१ वारा [ त्या रसास ] चंद्रलोकांप्रत नेऊन पोंचवितो, आणि तेथून सूर्यकिरणांचे साधनानें तो रस ऋग्वेद, यजुर्वेद, व सामवेदस्वरूप जें सूर्याचें स्थान तेथें प्राप्त होतो; १२२ सूर्य स्त्रलोकापासून जंगम आणि स्थावर • वस्तुमात्राचे जन्मास कारणीभूत असें जें उत्तम अमृतरूप पाणी त्या पाण्यास उत्पन्न करितो. १२३ हें अन्न यज्ञांत पुनः आहुत केलें जातें; [ यज्ञापासून ] पुनः अन्नोत्पत्ति होते; व तीपासून पुनः यज्ञ केला जातो. याप्रमाणें ज्यास आदि नाहीं व ज्यास अंतू नाहीं असें हें चक्र फिरत राहतें... १२४ आत्मा अनादि आहे, ह्मणून त्यास ( प्रत्येक व्यक्तींत राहणारे आत्म्यास ) उत्प- त्तैि नाहीं. [ शरिराशीं ]आत्म्याचा योग होणें हें मोह, इच्छा, द्वेष, व कर्म यांचा परि- णाम होय.. १२५ जो अनंतरूप आदिदेव ( परमात्मा ) [ पूर्वी ] मी स्पष्ट करून सांगितला त्याच्या मुखापासून, हातांपासून, मांड्यांपासून व पायांपासून [ यथानुक्रमानें ] चार वर्ण उत्पन्न झाले. १२६ पृथ्वी त्याचे पायांपासून उद्भवली, आकाश त्याचे मस्तकापासून, प्राणवायु त्याचे नासिकेपासून, त्याचे कानापासून दिशा, वायु त्याच्या स्पर्शापासून, त्याचेमुखापासून १२७ अग्नि ; चंद्र त्याचे मनापासून, सूर्य त्याचे नेत्रांपासून, आकाश आणि स्थावरजंगमात्मक. स्वर्व जग त्याचे कमरेपासून [ उत्पन्न झालें ]. १२८