पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ( ३३ ) स्त्री जर मद्यपि, व्याधिस्थ, सर्वकाळ नवण्यास टकविणारी, वांझ, उधळी, शिव्यागाळी करणारी, जिला मुलीच होतात व नवऱ्याचा द्वेष करणारी, अशा स्त्रीला कांहीं द्रव्य देऊन दुसरी स्त्री करावी. परंतु जेथें जातीमध्ये दुसरी स्त्री करण्याची चाल नसेल, तेथें असा विवाह केला असतां चालणार नाही. ३२ 33 ३२ ( ३४. ) दुसरे लग्न केल्यास, जर पहिली स्त्री निर्दोष असेल, तर तिला नवयानें आपल्या दौलतीचा तृतीयांश द्यावा, व तो द्रव्यहीन असेल तर तिचे पोषण केलेच पा- हिजे; आणि पूर्वीच्या आठ कारणांनी जर दूसरा विवाह केला, तर पूर्वीच्या स्त्रियांचें पोषण केलेच पाहिजे. ३४ . ( ३५. ) दक्षिण कानडा प्रांतांतील लिंगाईत लोकांत नवयाने टाकून दिलेल्या स्त्रीस पुनर्विवाह करितां येतो.५ शूद्रवर्ण खेरीज करून मात्र बाकीच्या लोकांमध्ये विधवांचा पुनर्विवाह करण्यास आधार नाही असे मानितात; परंतु स. १८९६ चा आक्ट १५ यावरून असे झालेले.विवाह कायदेशीर ठरून, त्यांपासून झालेली संतति दायास अधिकारी आहे असे ठरले आहे. ज्या जातीत विधवांनी पुनर्विवाह करण्याचा रिवाज आहे त्या जातींत विधवेचा बापाची वारस होण्याचा हक राहतो. असा विवाह झा- ल्यावर त्या विधवेना पहिल्या नवयाच्या. दायावरील हक नाहींसा होतो. ( सदरहू • आक्टार्चे कलम २ पहा). ३६ ( ३६. ) धर्मीतर करून ख्रिस्ती होणाऱ्याच्या विवाहाची व्यवस्था इ. स. १८६६ चा आक्ट २१ यांत सांगितलेली आहे. ख्रिस्ती होऊन जातिभ्रष्टता झाली तरी विवाह रद्द होत नाहीं असें मद्रास हाय कोटीने ठरविले आहे. ३७ ३२. मिताक्षरा, आचाराध्याय, विवाहप्रकरण श्लो० २३ पत्र ९पृ० २ रें. ३३. बारोडेकचे रिपोर्ट वालम १ के पृ० ३९८, या कज्जांत गुजराथी लोहारांच्या जातींतील रघुनाथ जेठा यानें पहिल्या बायकोच्या अनुमतीशिवाय लंम केल्यावरून, जातीच्या लोकांनी त्यास बहि- ष्कृत केले. तो बहिष्कार अपील कोटीनें कायम केला. बा० रि० वा० २ रे पृ० ५२४ ता० ५२८, यांत गन्धर्व जातीच्या एका पुरुषार्ने दुसरे लग्न के- त्यावरून त्याला जातीने बाहेर टाकिलें, व त्याच्या पहिल्या बायकोनें, आपके लग्न रद्द करावें अथवा दुसरीचें रद्द करावें, अशी फिर्याद आणिली. तेव्हां जातीचा रिवाज असा शाबीत झाला कीं, योग्य कारणाशिवाय जर कोणी दोन बायका करील, तर तसे करण्यास जी प्रतिकूल असेल, तिळा काडी तोडून द्यावी. याअन्वयें सदर अदालतीने अर्ज करणारी बायको इचें लम रद्द केलें. या प्रसंगी शास्त्राहून रूढि बलवत्तर असा इनसाफ झाला. ३४. मिताक्षरा, आचाराभ्याय, विवाहप्रकरण श्लो० २४ व २६ फ०० ९ पृ० २, ३५. वीरसंगप्पा वि. रुद्राप्पा इं. ला. रि. ८ म. ४४० ३६. हरिचरणदास वि. निमैचरण केवल इं. ला..रि. १० क्र. १३८ ३७. आडमिनिस्ट्रेटर जनरल वि. आनंदाचारी इं. ला रि. ९ म. ४६६.