पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२ याज्ञवल्क्यस्मृति. जळी, मांसरस दोन ओंजळी; आणि अस्थिमध्यांत असणारी चरबी एक ओंजळ ; डोक्यांत अर्धी ओंजळ मेंदु असतो. १०६ १०७ श्लेष्म्याचा तत्त्वांश व शुक्र हीं अर्धी ओंजळ असतात. या प्रकारानें [ वर्णिलेलें ] हें शरीर अमेध्य वस्तूंचें स्थान होय अशी ज्याची बुद्धि होईल तो मोक्षप्राप्तीस समर्थ होईल. हृदयापासून (रक्ताशयापासून) निवणाऱ्या अशा बहात्तर हजार वाहिनी (नाडया) निघतात. त्यांत कांहीं हितकारक व कांहीं अहितकारक [ अशा आहेत ]. यांचे मध्यभा- गीं चंद्राप्रमाणें देदीप्यमान, १०८ एक मंडल [ असून ] त्याचे मध्यभागी निश्चल दिव्याप्रमाणें, आत्मा असतो. त्याचें ज्ञान मनुष्याने करून घ्यावे. त्याला [ आत्म्याला ] एक वेळ मनुष्याने जाणल्यास " त्या मनुष्याला या लोकीं पुनर्जन्म नाहीं. १०९ आत्म्याचे ठायीं चित्तवृत्तीचे स्थैर्य व्हावें असें इच्छिणाऱ्याने सूर्यापासून मला प्राप्त झालेलें बृहदारण्यक उपनिषद् आणि मी जें योगशास्त्र सांगितलें आहे तें योगशास्त्र यांचें परिपूर्ण ज्ञान करून घ्यावें. ११० मन, बुद्धि, स्मृति, आणि इंद्रियें यांस इतर विषयांवरून काढून घेऊन हृदयांत दीपाप्रमाणे शरिराचा प्रभु आत्मा आहे, अशी संभावना करून मनुष्याने आत्म्याचें ध्यान १११ करावें. शास्त्रांत सांगितलेल्या विधानानें जो पुरुष निरंतर सावधान मन करून सामवेदाच्या ऋचांचे पठण करील तो त्या अभ्यासाने परब्रह्माला जाऊन पोचेल. 'अपरांतकं, ' ' उल्लोप्यं, ' ' मद्रकं, ' 'प्रकरी, ' तसेंच ' औवेणकं, आणि 'उत्तरं, ' ही गीतकें, 9 ११२ सरोबिंदु’ ११३ [ तसेंच ] ' ऋग्गाथा, ' ' पाणिका, ' दक्षविहिता, ' [आणि] 'ब्रह्मगीतिका' यांचा अभ्यास केल्यानें मोक्षप्राप्ति होते, ह्मणून यांस ( गीतकांस ) 'मोक्ष' अशी संज्ञा ११४ आहे. ज्यास वीणा आदिकरून तंतुवाद्ये वाजविण्याच्या तत्त्वांचे ज्ञान आहे, [गानकलेतील ] श्रुति व जाति यांचें पूर्णज्ञान ज्यांना आहे, तसें तालाचें ज्ञान ज्यास आहे तो प्रयासावांचू- न मोक्षमार्गास पोचतो. ११५ गीतशास्त्र जाणता योगक्रियेचे साधनानंही जर परमपदास (मोक्षास ) प्राप्त हो- णार नाहीं, तर तो [ मरणानंतर ] महादेवाचा अनुचर होऊन त्यासहवर्तमान सुखोपभोग घेतो. आत्म्याला आदि नाहीं, पण त्यानें शरीर [ धारण केल्यानें ] त्यास आदि प्राप्त ११६