पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रायश्चित्ताध्याय. रक्ताशयांत एक लहान पोकळी असते तो, वृक्ककौ ( मूत्रपिंड ), वस्ति, मलाशय, ८१ ९४ आमाशय, हृदय ( रक्ताशय ), गुदद्वाराचे वरचे बाजूची मोठीं आंतडीं, गुदद्वार, पोट व पोटांतील आंतडीं ( ह्मणजे एकंदर गळ्यापासून गुदापावेतों एकच आंतडें आहे, त्याचा वरचा खालचा भाग शिवायकरून राहिलीं तीं ) [हीं जिव्हाळ्याची ठिकाणें ] असें टलेले आहे. ९५ डोळ्यांची बुबुळे, डोळ्यांचे कोन, कानांची छिद्रे, कानांच्या पाळ्या, कान, शंख [ संज्ञक ] आंखांची हाडे, भिवया, दांतांच्या हिरड्या, दोन्ही ओंठ, ककुंदर ( कमरेचे खालचे भागाची दोन्ही छिद्रे ), ९६ मांड्यांचे मूळभाग किंवा सांचे, वृषण, मूत्रपिंड ( मूत्राशयांत जाण्यापूर्वी ज्यांतून मूत्र शुद्ध होत जातें तो पिंड), स्तन, श्वासमार्गाचा पडदा ( पडजीभ ), कल्ले, बाहु, पाय व मांड्या यांचे मांसल भाग ; ९७ [शिवाय ] टाळूची पोकळी, उदर, उदराचा खालचा भाग, डोकें, हनवटी, मानेचे मांसल पिंडरूप भाग, आणि शरिरावरील खळग्यांच्या जागा, हीं शरिरांतील स्थानें ; ९८ डोळे व कान [ मिळून ] चार; पाय, हात, आणि रक्ताशय; आणि नऊ रंध्रे ; हीं प्राणाची ( जिव्हाळ्याची ) ठिकाणे आहेत. ९९ सातरों शिरा [ शरिरास ] आहेत, नऊशैं स्नायु, धमनी (नाड्या) दोनशें, पांचशें पेशी (बांध). १०० शिरा, धमनी इत्यादिक संज्ञेच्या एकंदर रक्तवाहिन्या एकोणतीस लक्ष नऊशें छपन्न आहेत. १०१ पुरुषाच्या दाढी मिशा व केश मिळून तीन लक्ष असतात असें समजावें. मानवी शरिरांत एकशे सात मर्माच्या जागा आहेत, व दोनशे सांधे आहेत. १०२ केश व रोम व घाम येण्याची छिद्रे मिळून एकंदर चौपन कोटी सदुसष्ट लक्ष आणि पन्नास हजार इतकी आहेत. १०३ . वायूच्या परमाणूंनी शारीर परमाणू दूर दूर झालेले असल्यामुळे ही रोमपरमाणु- संख्या मोजलेली आहे. या प्रकारची [ शरिराची व्यवस्था ] जो कोणी जाणतो तो [ ज्ञा- त्यांमध्ये ] अग्रगण्य [ होय ]. १०४ हें ध्यानांत ठेवावें कीं, मानवी शरिरांत नऊ ओंजळी रस; पाणी दहा ओंजळी; मल सात ओंजळी; आणि रक्त आठ ओंजळी [ असतें ] असें सांगितलेले आहे. १०६ श्लेष्मा सहा ओंजळी; पित्त पांच ओंजळी; मूत्र चार ऑजळी; मांसतैल वीन ओं- ११