पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

याज्ञवल्क्यस्मृति. चौथ्या महिन्यांत [ गर्भाचे ] अवयवांस दृढता येते; पांचव्या महिन्यांत रक्त उत्पन्न होतें; साहव्यांत शक्ति, रंग, नखें, व केश उत्पन्न होतात. ८० सातव्या महिन्यांत [ गर्भास ] मन, चेतना, नाडी, स्नायु, शिरा हीं येतात; आणि आठव्यांत त्वचा, मांस, आणि स्मरण यांहीकरून युक्त होतो. ८१ आठव्या महिन्यांत गर्भाचें तेज ( बीजरूपप्राण ) गर्भातून मातेचे शरिरांत व मातेचे शरिरांतून गर्भात धांवत असतें; ह्मणून आठव्या महिन्यांत झालेलें मूल मरतें. ८२ नवव्या किंवा दहाव्या महिन्यांत [ गर्भाशयाचे ] संकुचित ठिकाणांत पिडलेला गर्भ प्रसूतिकाळचे जोरदार वाऱ्यांनी बाणाप्रमाणे बाहेर फेकून दिला जातो. ८३ त्याची सहा रूपांतरे होतात; त्यास सहा त्वचांचें परिवेष्टण असते; आणि [ शरि- राचे ] सहा भाग असून तीनशें साठ अस्थि असतात. ८४ दांत व त्यांचे मुळाशी असलेली हाडे मिळून एकंदर हार्डे चौसष्ट, नखांची संख्या वीस; हातांत व पायांत मिळून सरळ हाडें वीसच आहेत. [ नखें व सरळ हाडें ] हीं निरनिराळे चार ठिकाणी वांटली गेलेली असतात. ८५ बोटांत साठ हाडें आहेत, दोन दोहों टाचांत आहेत, चार गुडघ्यांत आहेत, चार बाहूंत, आणि तितकींच पायांत (गुडघ्याखालचे जाग्यांत ). ८६ हें लक्षांत ठेवावें कीं, गुडघे, गाल, मांड्या, बाहु, आंख, टाळू, व कुल्ले या प्रत्ये- कांत दोन दोन हाडें आहेत. ८७ गुह्यास एकच हाड आहे, पाठीस पंचेचाळीस आहेत, मानेस पंधरा आहेत, मान व बाहु यांतील प्रत्येक भागांत एक एक व हनवटीस एक आहे. 6 ८८ हनुवटीचे मुळाजवळ दोन आहेत; कपाळ, डोळे, आणि चाळे, या प्रत्येकास दोन दोन हाडें आहेत; नाकास एकच आहे, त्याला घन " असें ह्मणतात; कुशीतील हाडें, दांतांचे मूळाचीं हाडें, व ‘अर्बुद ' हाडें मिळून एकंदर बहात्तर होतात. ८९ [ कपाळ व कान यांचे मध्ये ] 'शंख' संज्ञक दोन हाडें आहेत. डोक्यास चार आहेत. छातीस सत्रा आहेत. याप्रमाणे मनुष्याचे शरिरांत हाडांची संख्या आहे. ९० गंध, रूप, रस, स्पर्श, आणि शब्द हे इंद्रियांचे विषय होत. नाक, डोळे, जिव्हा, त्वचा, व कर्ण यांस ज्ञानेंद्रियें ह्मणतात. ९१ कर्मेंद्रियें पांच आहेत ह्मणून समजावें. तीं अशीं :- हात, गुदद्वार, जननेंद्रिय, जिव्हा, आणि पाय. [ ज्ञानेंद्रियें व कर्मेंद्रियें ] या दोघांचे गुण मन या इंद्रियांत आहेत. ९२ नाभि, गुह्येद्रिय, गुदद्वार, पुरुषाचें वीर्य, स्त्रीचें शोणित, शंख [ संज्ञक हाडें ], डोकें बाहु, गळा, आणि छाती हीं प्राणाची (जिव्हाळ्याची ) ठिकाणे समजावीं. ९३ वपा ( संज्ञक पोटांतील त्वचा ), मज्जा, फुप्फुसें, नाभि, मूत्राशय, यकृत, प्लीहा,