पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रायश्चित्ताध्याय. ७९ जाणणारा, सर्वव्यापी, जो सर्व गुणांचे वासगृह, सर्व ज्याच्या आज्ञेत राहतें, तो कोणा- पासून उत्पन्न झालेला नसतांही त्याने शरीरधारण केल्यामुळे त्यास उत्पन्न झाला असें टलें जातें. ६९ पूर्वीच्यापेक्षां पुढल्यांत एक एक गुण जास्ती [ अशा प्रकारचीं] आकाश, वायु, अग्नि, जल आणि पृथ्वी [ ही पंचमहाभूतें] जशी सृष्टीचे आरंभीं त्यानें उत्पन्न केली तशा रीतीनें जेव्हां तो देहधारण करतो तेव्हां त्यांचा पुनः स्वीकार करतो. ७० [ यज्ञयागादि कर्मात दिलेल्या ] आहुतींनी सूर्य तृप्त होतो; सूर्य हा पाऊस आणतो; पाऊस धान्यादिकांस उत्पन्न करतो; धान्यादिकांपासून रस उत्पन्न होऊन त्या- पासून शुक्र उत्पन्न होतें. ७१ जेव्हां स्त्रीपुरुषांचा संयोग होतो त्या काळी पुरुषाचें शुक्र व स्त्रीचें शोणित हीं शुद्ध असल्यास सहावें तत्वस्वरूप जो जगदात्मा तो तत्काळ बाकीचीं पांच तत्वें धारण करतो. अवयव व इंद्रिये, मन, प्राण, ज्ञान, आयुष्य, सुख, चित्तस्थैर्य, व्यापारास लावणें, दुःख, इच्छा, अहंकार, होतें. ७२ धारणा, इंद्रियांना ७३ प्रयत्न, आकृति, वर्ण, स्वर, द्वेष, श्रीमंती, दारिद्र्य, हें सर्व, अनादि असूनही आदिभावाची इच्छा करणारा जो आत्मा त्याचे जन्मांतरीय कर्मापासूनच उत्पन्न ७४ [पंच ] भूतांत मिळून गेलेला असा आत्मा पहिल्या महिन्यांत रसरूपाने राहतो. दुसऱ्या महिन्यांत किंचित् कठिण असा [ मांसपिंडस्वरूप ] होतो. तिसऱ्या महिन्यांत अवयव व ज्ञानेंद्रिये त्यास उत्पन्न होतात. ७५ लाघव ( हलकेपणा ); सौक्ष्म्य ( सूक्ष्मज्ञानशक्ति ), स्वर, श्रोत्रेंद्रिय, व शक्ति वगैरे धर्म आकाशापासून; स्पर्शज्ञान, हालचाल, अवयव मोठे करण्याचे सामर्थ्य, व खरखरीतपणा हे धर्म वायूपासून; ७६ दृष्टि, पाचकशक्ति, गरमी, रंग, चकाकी [ हे धर्म अग्नीपासून ]; रसनेंद्रिय, शैत्य, स्नेहधर्म, द्रव, व मऊपणा हे धर्म जलापासून; ७७ गंध, घ्राणेंद्रिय, वजन, व आकृति हीं पृथ्वीपासून; हीं सर्व तिसऱ्या महिन्यांत आ- त्मा धारण करतो आणि नंतर थोडा थोडा हालूं लागतो. ७८ ज्या पदार्थाची इच्छा गर्भिणीस होते तो तिला न मिळाल्यास [ त्यापासून ] त्या गर्भास कांहीं तरी दोष किंवा विरूपता होईल किंवा मरणही येईल. तेव्हां तिचे डोहाळे पूर्ण करावे. ७९