पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ याज्ञवल्क्यस्मृति. दंड व कमंडलु हाती घेऊन, कोणास संगतीस न ठेवतां, अहंता ममतादिकांचा त्याग करून भिक्षा मागणे असेल तेव्हां मात्र गांवांत जावें.. ५८ सर्व इंद्रियांचा निग्रह करून, कोणाचे दृष्टीस न पडतां, जिव्हेस आवडतें नावडतें याकडे लक्ष न देतां, जेथें भिक्षेकरी नसतील त्या गांवीं अपराण्हानंतर दिवसा प्राणरक्ष- णापुरती भिक्षा मागावी. ५९. यतिपुरुषानें वापरण्याचीं योग्य पात्रे झटलीं ह्मणजे मातीचीं, बांबूचीं, लांकडाचीं किंवा भोपळ्याची ही आहेत. गाईचे केशांनीं तीं घासावीं व पाण्याने धुवावीं. ६.० सर्व इंद्रियांचा निग्रह केल्याने, राग व द्वेष हे सोडून दिल्यानें, व स्वतःपासून प्राणिमात्रास भीति नाहींशी केल्यानें द्विज मुक्त होतो. ६१ ज्ञानप्राप्तीकरितां व आत्मध्यानधारणाविषयीं, परतंत्रतारूप विघ्ननिवारणाकरितां, यतिपुरुषानें विशेषतः आपले अंतःकरण निर्मल केलें पाहिजे. ६.२ गर्भवासस्थिति, कर्मापासून होणाऱ्या गति, मनाच्या व्यथा व शरिराच्या व्यथा, क्लेश, जरा, रूपविपर्यय ( शारीर व्यंगें ) ही ध्यानांत आणावीं. ६३ सहस्रावधि जातींचे प्राण्यांच्या जन्मास जाणें व आपल्याला जें इष्ट तें अप्राप्त. · होणें व जें अनिष्ट तें प्राप्त होणें याविषयीं विचार करावा, आणि आपल्या सर्व अंतःकरण - वृत्तीस ऐहिक विषयांपासून सोडवून व त्यांस एकत्र स्थिर करून ध्यानयोगाचे साधनानें सूक्ष्म विचार करून पहावें कीं आपला [ शारीर ] आत्मा व परमात्मा हे एकच आहेत. ६४ आत्मज्ञानप्राप्तीस केवळ वेष पालटणें हें साधन नव्हे, कारण वेष पालटणें हें कोणीही करील. यासाठीं आपणांस जेर्णेकरून दुःख होईल अशी गोष्ट दुसऱ्या कोणास - ही प्राप्त होऊं देऊं नये. ६.१ सत्य भाषण करणें, चोरी न करणें, राग टाकून देणें, मर्यादशीलपणा राखणें, प-- वित्रपणा ठेवणें, विवेकबुद्धि ठेवणें, इष्टाची अप्राप्ति व अनिष्टाची प्राप्ति झाली तरी चित्त एकसारखेंच ठेवणें, मनोवृत्तीचा निग्रह करणें, इंद्रियनिग्रह करणे, व आत्मज्ञान संपादणें यांत यतीचे सर्व धर्म आले. ६६ तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यापासून जशा ठिणग्या उडतात तशा रीतीनें एका [ जगदात्म्यापासून] अनेक जीवात्मे उत्पन्न होतात. ६७ तेव्हां आत्मा कांहीं कर्में ( बरी किंवा वाईट ) समजून उमजून करतो; कांहीं स्वभावतः त्याला वाटेल तशी करतो; व कांहीं पूर्वजन्मीच्या कर्मानुरोधानें करतो. ६८ जो [ जगास वगैरे ] आदिकारण, जो अनश्वर, आदिकर्ता प्राण्यांचीं पापपुण्यें