पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रायश्चित्ताध्याय. ७७ उखळ सळानें [ खाण्याच्या धान्याचें टर्फल ] न काढतां, त्या ठिकाणी आपल्या दांतांचा उपयोग करावा; प्रत्येक ऋतूंत ज्या ( फलादिक ) वस्तु परिपक्क होतात त्यांवर उपजीविका करावी; [ कुटण्याचे काम ] चापट दगडावर करावें; आणि श्रुति व स्मृति यांत सांगितलेलीं धर्मकृत्यें व सर्व व्यावहारिक क्रिया फलांतून काढलेल्या तेलानें कराव्या. ४९ चांद्रायण करून कालक्षेप करावा, किंवा कृच्छ्र व्रतें करीत नेहेमी राहावें, आणि पंधरवड्यांत किंवा महिन्यांत किंवा दररोज सूर्यास्तानंतर एक वेळ भोजन ५० करावे. रात्रौ निर्मल अंतःकरण करून जमिनीवर निजावें. हिकडे तिकडे फिरत फिरत, किंवा कांहीं वेळ उभे राहून पुनः बसून आणि नंतर पुनः फिरावयास लागून किंवा योगा- भ्यासांत सर्व दिवस घालवावा. ५१ ग्रीष्म ऋतूंत ( उन्हाळे दिवसांत ) पंचाग्निमध्यें बसावें, पावसाळ्यांत स्थंडिलावर ( अरक्षित ठिकाणी ) निजावें, थंडीचे दिवसांत ओली वस्त्रे नेसावी; [ पण असें करवत नसेल तर ] स्वशक्तिप्रमाणानें तपश्चर्या आचरावी. ५२ जो कांट्यांनी त्यास टोचतो किंवा चंदनाची उटी त्याचे अंगास लावतो त्या दोघां- सही त्याने सारखे समजावे. एकावर राग करूं नये किंवा दुसऱ्यावर खुष होऊ नये; ५३ किंवा अग्नींस आपल्या शरिरांत तन्मय करून वृक्षाचा आश्रय धरून त्याखाली रहावें; मोजकें अन खावें, आणि प्राणरक्षण होण्यापुरतें भिक्षान्न वानप्रस्थाश्रम्याचे घरीं मागावें; ५४ किंवा आठ घांस अन्न गांवांतून मागून मौन धरून खावें; किंवा वायुभक्षण करून देहाचा नाश होईपावेतों ईशानी दिशेस जावें. यतीचे धर्म. ५५ गृहस्थाश्रम किंवा वानप्रस्थाश्रम पुरा केल्यावर प्रजापतीष्टि करून सर्वस्वाची दक्षि- णा द्यावी व ती दिल्यावर, श्रौतस्मार्ताग्नि आपल्या शरिरांत धारण केल्यावर, ५६ ज्यानें वेदाध्ययन केलेलें आहे, जप करणारा, ज्यास पुत्रसंतति झालेही आहे, ज्यानें [ लोकांस ] अन्नदान केलेलें आहे, ज्यानें अग्निसंतर्पण केलेलें आहे, व ज्यानें यज्ञ- यागादिकमें शक्तीप्रमाणें केलेली आहेत अशानें मोक्षसाधनाकडे आपलें अंतःकरण लावावें; पण ही झालेली नसल्यास तसें करूं नये. ५७ सर्व प्राण्यांच्या प्रियाविषयीं व अप्रियाविषयीं उदासीन, शांतवृत्ति राहून, तीन