पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७६ याज्ञवल्क्यस्मृति. संबंधी कृत्यांसाठी तीळ देऊन त्यांचे मोबदला तितकें धान्य घेतल्यास प्रत्यवाय नाहीं. ३९ लाख, मीठ, किंवा मांस विकणें हें जातिभ्रष्ट करण्यास कारणीभूत होय; आणि दूध, दहीं किंवा मद्ये विकल्यास तें हीनवर्ण करण्यास कारणीभूत होतें. ४० ब्राह्मण आपत्तींत असतां त्यानें कोणापासून देणगी घेतल्यास, कोणाचेही हात- अन्न खाल्यास, त्यास दोष लागत नाहीं; कारण अग्नि आणि सूर्य यांचेसारखा ब्राह्मण [ होय ]. ४१ शेतकी, हस्तकौशल्याचीं कामें, नोकरी, शिक्षण, गाहाणाचा धंदा, वहाने भाड्यानें देर्णे, डोंगरांतून [ आणलेलें गवत व जळाऊ लांकडें विकणें ], [ श्रीमान् लोकांची ] मर्जी संपादणे, पाणथळ जमिनीची लागवड करणें, राजाचा [ आश्रय मागणें ], आणि भिक्षा मा- गणे, हे विपत्तींत असलेले पुरुषास उदरनिर्वाहाचे मार्ग होत. ४२ [ अन्न नच मिळे तर ] तीन दिवस उपास काढून नंतर ब्राह्मणांवांचून इतरांचे धान्य चोरण्यास प्रत्यवाय नाहीं. अशा रीतीनें धान्य नेल्यावर त्यास विचारल्यास त्यानें खरेपणानें कबूल करावें. ४३ [ अशा रीतीनें धान्य चोरणाराची ] वर्तणूक, कुल, शील, वेद व शास्त्र यांत त्याची प्रवीणता, त्याची तपश्चर्या व कुटुंब यांची चौकशी करून त्याचा चरितार्थ योग्य मार्गानें होऊं शकेल अशा रीतीनें त्याचेबद्दल तजवीज राजाने करावी. वानप्रस्थाचे धर्म. ४४ वानप्रस्थाश्रमानें चालूं इच्छिणाऱ्या द्विजानें आपल्या पत्नीस पुत्राचे स्वाधीन करून किंवा तिच्या सहवर्तमान आपले [श्रौताग्नि किंवा स्मार्ताग्नि] बरोबर घेऊन, व ब्रह्मचर्यव्रतानें वनवासास जावें. ४५. तेथें गेल्यावर तोंडावरील, डोक्यावरील व इतर सर्वांगावरील त्यानें केश वाढू द्यावे, व नांगरलेले शेतांत उत्पन्न न झालेले धान्याने अग्नि, पितर, देवता, अतिथि व चाकरमाणसें यांस तृप्त करून आत्मज्ञानसंपादनतत्पर असावें. ४६ · एक दिवस, एक महिना, किंवा ६ महिने किंवा एक वर्ष पुरे इतकेच धान्याचा सांठा त्यानें त्या ठिकाणी गेल्यावर करावा [ वर सांगितल्यापेक्षां ] ज्यास्ती सांठा असेल तो आश्विन महिन्यांत खर्चावा. ४७ त्यानें आपल्या कामक्रोधादिकांचा संयम करून दररोज त्रिकाल स्नान करावें, कोणापासून दान घेऊं नये, वेदांचा अभ्यास करावा, दानशील व्हावें, आणि प्राणिमात्राचे कल्याणासाठी तत्पर रहावें. ४८