पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रायश्चित्ताध्याय. ७५ चालणारे पुरुषांस, जो नेहेमी दान देतो व कधीही दान घेत नाहीं तो आणि ब्रह्मवेत्ता इतक्यांस [ अशौचदोष लागत नाहीं ]. २८ दानधर्म कार्ये करण्याचे प्रसंगीं [ र्ती करण्याचें पूर्वी ठरविलेले असल्यास ], लग्नसं- स्कार, यज्ञयागादिक प्रसंगी, लढाईचे प्रसंगीं, सर्व देशावर एकादा विपत्तिप्रसंग आलेला . असेल तेव्हां, अथवा पुरुष जेव्हां एकाद्या संकटांत पडलेला असेल तेव्हां अशौच तत्क्ष- णींच जातें असें शास्त्र आहे.. २९ रजस्वला स्त्रीचा किंवा अपवित्र पुरुषांचा स्पर्श झाल्यास पुरुषांनें स्नान करावें; व त्यांनी शिवलेल्याचा स्पर्श झाल्यास आचमन करावें व ' अब्लिंग' मंत्र ( उदकाचे स्तु- तिपर वेदोक्त मंत्र ) तोंडानें ह्मणून एक वेळ गायत्रीज करावा ह्मणजे शुद्धि होते. ३० काल, अग्नि, धर्मकर्मै, माती, वारा, मन, ज्ञान, तप, पाणी, पश्चात्ताप, व निराहार ह्रीं सर्व शुद्धि करणारी आहेत... करूं नये तें कर्म करणाराची शुद्धि करणारें दान होय; नदीची शुद्धि तिचा वेग होय; अपवित्र वस्तूंची शुद्धि करणारी उदक व माती हीं होत; व शुद्धि करणारा चतुर्थाश्रम होय. ३१ करणारा द्विजांची ३२ वेदवेत्ते पुरुषांची शुद्धि करणारें तप होय; ज्ञाते पुरुषांची शुद्धि करणारी क्षांति ; शरिरात्री शुद्धि करणारें जल ; ज्यांचीं पापकमें गुप्त आहेत. त्यांची शुद्धि करणारा [ अ- घमर्षणादिसूक्त ] जप; आणि मनाची शुद्धि करणारें सत्य. होय, असें लटलेले आहे. ३३ तप व आत्मज्ञान ही आत्म्याची शुद्धि करणारी होत; अशुद्ध बुद्धीची शुद्धि क- रुणारें प्रमाणज्ञान ; ईश्वराचें ज्ञान हे आम्याची शुद्धि करणारें परम साधन होय.. आपत्तिकाळची कर्मै.. ३४ आपत्तिकाळीं क्षात्रधर्माने किंवा वैश्यधर्माने चालून द्विजानें उपजीविका करण्यास प्रत्यवाय नाहीं. आपत्तिकाळांतून पार पडून गेल्यावर आपली शुद्धि करून घेऊन पुनः आपल्या पूर्वीचे मार्गावर यावें (स्वधर्मस्वीकार करावा ).. ३.९ फर्के, रत्ने, [ ताग वगैरेचें ] कापड, सोमवल्ली, मनुष्य, पक्वान्ने, वेली, तीळ, शिज़- लेला भात, रस, खार, दहीं, दूध, तूप आणि पाणी ; ३६. शस्त्रें, मघें, मेण, मध, लाख, कुश, माती, कातडी, फुलें, कांबळीं, केश, ताक, विष, जमीन ; ३७ रेशमी कापड, नीळ, मीठ, मांस, एक खुराची जनावरें, शिसें, भाजीपाला, हिरव्या ओषधी, पेंड, रानटी जनावरें, तसेच सुगंधी पदार्थ; ३८ हे पदार्थ वैश्याचे कर्मावर उपजीविका करणारे ब्राह्मणानें कधींही विकूं नये. धर्म-