पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ याज्ञवल्क्यस्मृति. दिवस अपवित्र असा समजूं नये, कारण कीं, [ तो दिवस ] पित्रादि पूर्वजांचा पुत्ररूपानें जन्मास येण्याचा दिवस होय. १९ एका सोहेरांत दुसरा सोहेर, किंवा एका सुतकांत दुसरें सुतक आल्यास पहिलें ज्या दिवशीं फिटतें त्याच दिवशीं दुसरेही फिटतें असें समजावें. गर्भस्राव ( सात महिने भरण्यापूर्वी नासावणें ) झाल्यास गर्भ जितके महिन्यांचा असेल तितक्या दिवसांनी मातेची शुद्धि होते. २० राजानें, गाय किंवा बैलाने वगैरे, किंवा ब्राह्मणानें, ठार मारल्यास त्याबद्दलचें किंवा आत्महत्या करणारांचे मरणाशौच मृताचे सपिडांस तज्ज्ञानक्षणीं मात्र आहे. देशांतरी फिरायास जाऊन परदेशीं [ मनुष्य मेल्यास ] त्याचे सपिंडाचे अशौच [ नेहमींचे दहा दिवसांचे मुदतीपैकीं ऐकिल्यावर ] जितके दिवस राहिले असतील तितके दिवस पावतो. शेषदिवस भरतील त्या दिवशीं उदकदान केल्याने [ द्विजांची ] शुद्धि होते. २१ [ सपिंडाचें ] जननाशौच व मृताशौच क्षत्रियानें बारा दिवस, वैश्याने पंधरा दिवस, शूद्रानें तीस दिवस [ धरावें. ] धार्मिकवृत्तीने चालणारे शूद्राने पंधरा दिवस मात्र धरावे. २२ दांत येण्यापूर्वी मूल मेल्यास त्याचे सपिंडांची तत्क्षणीच शुद्धि होते; दांत आल्या- वर चौलकर्म होण्यापूर्वी मेल्यास सपिंडांस त्याचे सुतक एक दिवस; चौलकर्मानंतर आणि उपनयनापूर्वी तीन दिवस; त्यापुढे सर्व प्रसंगी मरणाशौच दहा दिवसपावेतों सांगितलें आहे. अविवाहित कन्या, दांत न आलेले लहान मूल, गुरु, शिष्य, अनूचान ( वेदांगें पढविणारा), मामा, किंवा श्रोत्रिय (स्वग्रामस्थ वैदिक ), यांचे मरणाबद्दलचे अशौच एक दिवस. २३ २४ अनौरस पुत्र, व्यभिचारी स्त्रिया, किंवा ज्या ठिकाणी वस्ती असेल त्या ठिकाणचा राजा हे मेल्यास त्यांबद्दल सुतक एक दिवस. २५ [ सपिंड शिवायकरून ] कोणत्याही वर्णाचे [प्रेताबरोबर ] ब्राह्मणाने कधीही जाऊं नये; गेल्यास वहात्या प्रवाहांत स्नान करून व अग्नीस स्पर्श करून घृतप्राशन केल्यानें त्याची शुद्धि होते. २६ राजांस अशौचाचा दोष लागत नाहीं. वीज पडून जो मेला किंवा गोब्राह्मण- संरक्षणार्थ किंवा युद्धांत जो मेला त्यापासून अशौच उत्पन्न होत नाहीं; अथवा ज्या मनुष्याची राजास जरूरीच असेल त्यास [ अशौचदोष ] लागत नाही. २७ तसेंच यज्ञांतील कर्म करणारे ऋत्विज व यजमान त्यांस, जे पांथस्थांस अन्न दे- तात त्यांस, ज्यांणी कृच्छ्रचांद्रायणादि व्रत आरंभिलेलें असेल त्यांस, ब्रह्मचर्यव्रतानें