पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रायश्चित्ताध्याय. ७३ जन्मांतरींचे कर्माचे हेतूंनी हा पांच महाभूतांचा देह बनलेला आहे, आणि शरिरांत उद्भ- वलेल्या कारणांनी तो देह जर पंचत्व पुनः पावेल ( ह्मणजे पांच भूतें आपापल्या तत्त्वांत पुनः मिळतील) तर दुःख कां करावें ? ९ पृथ्वी, समुद्र, आणि देव [ हेही ] नाश पावणारे आहेत. तेव्हां फेंसाप्रमाणें [ ना- शवंत ] हा मर्त्यलोक कां नाश पावणार नाहीं ? १० [ दुःख करणारे ] बांधवांनी गाळलेले अश्रु व [टाकलेला] श्लेष्मा मृत मनुष्यास तो परतंत्र असल्यामुळे खावा लागतो, त्या अर्थी त्यांनी रुदन करूं नये; तर आपल्या शक्ती- प्रमाणे [मृताच्या उत्तर ] क्रिया कराव्या. ११ याप्रमाणें [ शांतवनासाठीं केलेलें भाषण ] ऐकून लहान मुळे असतील त्यांस पुढे घालून बांधवांनी घरी जावें, [आणि] घराचे दरवाजाजवळ जाऊन स्थिरचित्त होऊन कडुनिंबाची पाने चावून १२ आचमन करावें, व विस्तव वगैरे, पाणी, गोमय, पांढऱ्या मोहोन्या, यांस स्पर्श करून दगडावर पाय ठेवून हळू हळू घरांत प्रवेश करावा. १३ प्रवेशपर्यंत जीं मैं [ वर सांगितलीं ] तीं, स्नानप्राणायामेंकरून तत्क्षणींच शुद्धि व्हावी अशी इच्छा करणारे असपिंड ज्ञातींचे लोक प्रेतसंस्पर्शी असतील त्यांनीही केली पाहिजेत. १४ ब्रह्मचाऱ्याने आपले आचार्याचे, मातापितरांचे, किंवा उपाध्यायाचे प्रेत नेले तरी त्याचा व्रतभंग होत नाही. अशौचयुक्त ज्ञातीनें तयार केलेले अन्न त्यानें खाऊं नये, व त्यांच्याशी सहवास करूं नये. १५ [ मृताचे ज्ञातीचे माणसांनीं ] अशौचांत विकत घेतलेले किंवा कोणी दिलेले अन्ना- वर निर्वाह करावा; व प्रत्येकानें जमिनीवर निरनिराळें निजावें. [ पिंडपितृयज्ञ ] कर- ण्याचा जो प्रकार आहे त्याप्रमाणे मृताला तीन दिवसपावेतों अन्न द्यावें. १६ प्रथम दिवशीं पाणी आणि दूध हीं मातीचे निरनिराळे पात्रांत टांगून ठेवावी. [ गा- र्हपत्य, आहवनीय, आणि दक्षिणाग्नि ] या अग्नीवर किंवा स्मार्तीनीवर ज्या धर्मक्रिया क- रण्याच्या त्या सर्व वेदांत सांगितल्या आहेत ह्मणून कराव्या. १७ [ सॉपडांस किंवा समानोदकांस ] मरणाशौच, [ अनुक्रमें ] दहा दिवस किंवा [तीन दिवस असतें ], जसें अस्पर्शलक्षगजननाशौच एकटे आईस मात्र असतें, तशा रीतोनें दोन वर्षांचे आंतील वयाचे मुलाबद्दलचे मरणाशौच त्याचे आईबापांस मात्र [ असतें ]. १८ मूल उपजल्याबद्दलचें अशौच त्याचे आईबापांस मात्र लागू. तरी मातेचेसंबंधानें हैं अशौच रक्तस्राव १० दिवस होतो ह्मणून तोंपावतों असतें. [ मुलाचे जननाचा ] १०