पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र. २ विवाहाविषयी. तिला आवडत २६ २६ साठी व पहिला विवाह सशास्त्र आहे असें ठरविण्यासाठी पहिल्यां नवयास दावा आणतां येईल.२५ जर एकाया मुलीच्या बापाच्या बाजूकडील नातेवाईक तिचे कोणत्याही तऱ्हेने पालन न करतां तिचा विवाह ति अहित होईल अशा रीतीनें करतील तर तसे न होईल अशी खबरदारी ठेवण्याचा कोर्टास अधिकार आहे. तिला परराज्यांत देण्याची मनाई. करितां येईल, कारण, नाहीं तर ती कोर्टाच्या हुकुमतीबाहेर जाईल. नाही अशा वराशीं विवाह करणे भाग पाडूं नये. ज्यास द्वान करण्यास अधिकार नाहीं असा दान करूं लागल्यास त्यास अधिकारी इसमाच्या अर्जानें ताकीद देतां येईल. (अ) त्यांनीं न केल्यास तिर्ने स्वतः विवाह करावा. तो १२ किंवा १६ व्या वर्षी करावा. पुरुषाचें कोणी करणारा नसेल तर त्याचें त्यानेंच नांदीश्राद्ध इत्यादि करावें. लग्न तर ज्याचे तोच करितो. कलकत्ता हायकोर्टानें असें ठरविले आहे कीं, नान्दीमुख अथवा वृद्धिश्राद्ध हा संस्कार विवाहास अवश्य नाहीं, अथवा पालनकर्त्याने आपली संमति दिली नाहीं तर विवाह अशास्त्र ठरलाच पाहिजे असे नाहीं. वैवाहिक हक्क स्थापन करण्या- साठीं आणलेले फिर्यादींत विवाह झाला असे एकदां शात्रीत झाल्यावर सर्व संस्कार पुरे झाले आहेत असेच धरून चाल्ले पाहिजे. नेहमींच्या विधीशिवाय जातीच्या अथवा प्रांताच्या रिवाजानें अमुकच विधि अवश्यक आहे असे ठरल्यास त्याप्रमाणे विवाह का - यदेशीर होईल. २८ ९ . ३. ( ३१.) आतां वाग्दान आणि सप्तपदीक्रमण हीं झालीं ह्मणजे मग पित्याच्या विचाराशिवाय आईने केलेलेही कन्यादान फिरत नाहीं. यावरून अशा दात्यानें अ- प्रकृतिस्थ असतां केलेले नसल्यास, लग्न रद्द होणार नाहीं. दुसरें बहुधा सर्वसंमत असे दिसतें कीं, सप्तपदीक्रमण होऊन गेल्यावर कोणताह विवाह पूर्ण झाला, तो कधींही फिरणार नाहीं. ( ३२ ) परंतु जर उभय पक्षींच्या आईबापांच्या अनुमतीशिवाय मागणीचा क रार झाला असेल तर तो. करार तोडिल्याबद्दल नुकसानीचा दावा चालणार नाही, असा मुंबई सदर अदालतीचा ठराव झाला आहे. २५ वेंकटाचार्लु धि रंगाचार्लु इं. ला. रि. १४ म ३१६. २६. श्रीधर वि. हिरालाल इं. का. रि १२ मुं. ४८०. २६ (अ). नानाभाई वि. जनार्दन इं. ला. रि. १२ मुं. ११०. २७. निर्णयसिंधु, परिच्छेद ३ रा, पत्र ३१, पृष्ठ १, पंक्ति ४; बौधायनवचन पराशरमाधवीय ग्रंथांतील. २८. वृंदावन वि. चंद्रा इं. ला रि. १२ क. १४०. २९. हरिचरण वि. निर्मैचरण इं. ला. रि. १० क. १३०. ३०. मुंबई सदर दिवाणी अदालतीचा ठराव, ता. ८ भागस्ट स. १८४३; स्पे. अ. २००१; बे- लासिस रपोर्ट, पृ. ४३ पहा. • ३१. ठराव ता. ९ मे १८०९ बारेडिलचे रिपोर्ट, वालम १ लें पृ. १४.