पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रायश्चित्ताध्याय. सोहेर सुतकादिक प्रकरण. दोन वर्षांहून कमी वयाचें मूल [ मेल्यास ] त्यास पुरावें. त्यास उदकदान करूं नये. इतर मनुष्य मरतें तेव्हां त्याचे प्रेताबरोबर त्याचे जातीचे लोकांनीं स्मशानभूमीपावेतों जावें. १ यमसूक्तें व यमगाथा यांचा जप तोंडांनी करीत लौकिकाम्नीनेंच त्यास [ बरोबर गेलेले लोकांनी ] जाळावे. [मृताचें ] उपनयन झालेले असल्यास, संभवेल तितकें त्याचें दहन गृहस्थाश्रम्याच्या दहनाप्रमाणें करावें. 6 २ सातव्या किंवा दहाव्या दिवसाचे पूर्वी ज्ञातीचे लोकांनीं प्रवाहाजवळ जाऊन 'अपनः शोशुचददघम्' हा मंत्र तोंडानें ह्मणून व दक्षिणेस तोंड करून [ तर्पण करावें ]. ३ याचरीतीनें मातामह व आचार्य यांचे तर्पण उदकानें करावें. मित्र, विवाहित कन्या किंवा बहिणी, भाचा, सासरा, ऋत्विज ( धर्म संस्कार करणारा ), यांच्या नावानें त्यांच्या कल्याणाची इच्छा ज्यास असेल त्यानें अशौच आहे तोपर्यंत नित्य तर्पण करावें. ४ मौन धारण करून मृतमनुष्याचें नाव व गोत्र यांचा उच्चार करून, ब्रह्मचारी व पतित हे शिवायकरून बाकीचे ज्ञातीनें [मृतास ] एकवार उदकदान करावें. ५ जे पाखांडी ( शास्त्रविरुद्ध बाह्यवेषानें राहाणारे) असतील; सामर्थ्य असून [चार] आश्रमांपैकी ज्यांनी कोणताही आश्रम घेतला नसेल; जे चोर असतील; स्वपतीचा घात करणाऱ्या ज्या स्त्रिया असतील; मद्यपी, व्यभिचारिणी वगैरे स्त्रिया; व ज्यांनी आत्महत्या केली असेल; अशा मनुष्यांबद्दल [ ज्ञातीनें ] सुतक धरूं नये व त्यांस उदकदान करूं नये. [मृताचे ज्ञातीचे लोकांनीं ] उदकतर्पण केल्यावर स्नान करून उदकाचे प्रवाहा- बाहेर आल्यावर सर्वांनीं नरम गवताची जागा पाहून तीवर बसावें. त्यांत जे [ वयोवृद्ध ] असतील त्यांनीं पुरातनकाळचे इतिहासांतील गोष्टी सांगून [ ज्ञातीचें ] दुःखाचें शांतवन करावें. ७ हें प्राणिजीवित केळीचे खांबाप्रमाणें निःसार असतां व पाण्यांतील बुडबुड्याप्रमाणें [ अशाश्वत ] असून त्यांत शाश्वततेची बुद्धि जो मनुष्य धरतो तो अतिमुढ ( अजाण ) होय.