पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यवहाराध्याय. ७१ सामर्थ्य असूनही त्या जनावराचा धनी [ दुखावलेले माणसाचे ] मदतीस जाणार नाहीं तर त्यास प्रथमसाहस दंड केला पाहिजे. परंतु [ दुखावलेला मनुष्य ] ' धांवा धांवा ' ह्मणून ओरडल्यावरही न गेल्यास त्याबद्दल दुप्पट दंड. ३०० जारावर चोराचा आरोप आणील त्यास शिक्षा ह्मणून त्याजकडून पांचशें [ पण ] दंड देवविला पाहिजे. [ अपराध्याकडून ] लांच घेऊन जो त्यास सोडून देईल त्यास आठपट दंड ( चारहजार पण ) सांगितलेला आहे. ३०१ राजाला न आवडणारें असें पुन्हा पुन्हा बोलणारा, त्याची अपकीर्ति जो पसरील, किंवा त्याच्या गुह्य गोष्टी (मसलती) बाहेर फोडील, त्याची जिव्हा कापून त्यास स्वदेश- पार राजानें करावें. ३०२ प्रेतावरील वस्तु जो. विकील, जो आपल्या गुरूस मारील, जो राजाचे वाहनावर किंवा त्याचे सिंहासनावर बसेल त्यास उत्तमसाहस दंड केला पाहिजे. ३०३ [ दुसऱ्याचे ] दोन्ही डोळे जो फोडील त्यास, व राजाचें अनिष्ट कथन करणारा त्यास, व जो शूद्र असून ब्राह्मणाप्रमाणें वागेल त्याप्त, दंड आठशे [ पण ]. ३०४ अन्याय्य ठराव राजानें फिरवावा; आणि सम्यांस ( सभासद ह्मणून जे मंत्री अस- तात त्यांस ), व ज्यांचे तर्फे तो ठराव केलेला असेल त्यास मिळून [ दाव्यांतील ] रक- मेचे दुप्पट दंड करावा. ३०५ एकाद्या मनुष्याचा दावा न्यायानें बुडाला असून 'माझा न्यायानें पराजय केलेला नाहीं, असें ह्मणून पुनः तो न्यायसमेंत येईल ( ह्मणजे कोर्टात पुनः दावा करील किंवा अपील वगैरे करील ) आणि पुनः त्याचा दावा बुडेल तर त्याजकडून दुप्पट दंड घ्यावा. ३०६ जो दंड राजानें अन्यायाने घेतलेला असेल तो त्यानें वरुण देवतेच्या नावाने संकल्प करून त्याचे तीस पट [ द्रव्य ] राजानें स्वहस्तानें ब्राह्मणांस द्यावें. ३०७