पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० याज्ञवल्क्यस्मृति. एका दासीशीं अनेक पुरुष तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीनें व्यभिचार करतील तर प्रत्ये- कास चोवीस पण दंड करावा. २९१ वेश्या स्त्री [पुरुषापासून ] पैसा घेतल्या नंतर [ त्याशी जाण्यास ] नाराज होईल. तर तिनें घेतलेले पैशाचे दुप्पट रक्कम परत देवविली पाहिजे. कसर करून तिला पैसा पोंचण्यापूर्वी जर ती नाकबूल होईल तर तितकाच दंड. त्याच रीतीनें [ वेश्येस ] पैसा दिल्यानंतर जर पुरुष तिच्याशी राजी नसेल तर त्यानें [आगाऊ दिलेला ] पैसा बुडाला. २९२ स्वाभाविक इंद्रिय सोडून स्त्रीच्या अन्य इंद्रियांशीं व्यभिचार करील, [ अथवा स्त्रीचे सन्निध ] मूत्रस्राव किंवा मलविसर्जन करील तर त्यास चोवीस पण दंड केला पाहिजे... संसार सोडून देवभक्तीनें चालणारे स्त्रीशी व्यभिचार करणारास तोच दंड.. २९३. अंत्यज जातीचे स्त्रीशी जो व्यभिचार करील त्याचे अंगावर बीभत्स आकृतीचा डाग देऊन त्यास देशपार करून द्यावें. शूद्रानें असें कर्म केल्यास तो चांडालच होतो ... परंतु अंत्यज जातीचे पुरुषानें उत्तम वर्णाचे स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्याचा वध केला. पाहिजे. किरकोळ बाबती.. २९४. राजाचे आज्ञापत्रांत जो कोणी कमजास्त मजकूर घालील अथवा जारास किंवा चोरास [कैर्दैतून ] सोडील त्यास उत्तमसाहस दंड केला पाहिजे. २९५ त्या त्या वर्णानें खाण्यास निषिद्ध अशा वस्तु खाऊं घालून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, व शूद्र यांस जो बाटवील त्यास अनुक्रमानें उत्तमसाहस, मध्यमसाहस, अधमसाहस, व अधमसाहसाचा अर्धदंड केला पाहिजे. २९६. बनावट सोन्याचा (मुलाम्याचा वगैरे ) व्यापार करून जो खन्या सोन्याचे व्यापा- राप्रमाणें [ लोकांस ] भासवील, तसेंच जो अमंगळ मांस विकील त्याचा एकादा अवयवः तोडून टाकून त्याजकडून उत्तमसाहस दंड घ्यावा. २९७ “ दूर व्हा " असें मोठ्याने ओरडून जर कोणी गाडीवाला किंवा गुराखी गुरें, ढोरें, तुळया वगैरे, माती, दगड, हत्यारें अथवा जुंपलेले बैल नेत असतां त्यापासून कोणास दुखापत होईल तर तो अपराध नव्हें. २९८ [ जनावरांची ] नाथ तुटून गेल्यामुळे, जूं किंवा असेंच कांहीं मोडल्यामुळे, किंवा वाहनाची जनावरें मार्गे हटल्यामुळे एकाद्या वाहनापासून कोणाचा प्राणनाश झाल्यास त्या ...वाहनाचे धन्याकडे अपराध आहे असें समजलें जाणार नाहीं.. २९९. दांत किंवा शिंगे असलेले आपले जनावरानें [कोणा माणसास इजा केली असतां ]