पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यवहाराध्याय. व्यभिचार. ६९ [ व्याभिचाराचे कामांत ] त्या कृत्यांत असतां, पुरुषास पकडावें; किंवा [ स्त्री- पुरुषांनीं ] परस्परांचे केश परस्परांनी धरलेले असतां, किंवा कामापासून उद्भवलेल्या इतर चिन्हांवरून, किंवा उभय ( स्त्रीपुरुषांचे) कबुलातीवरून [ त्याची शाबिती करावी. ] २८३ [ परस्त्रीच्या ] निरीस, स्तनास, वस्त्रास, मांडीस व केशांस जो स्पर्श करतो, अ- योग्य ठिकाणी व अयोग्य वेळीं जो तिच्याशी गोष्टी सांगतो, किंवा जो तिच्याशी एकांत- स्थळीं बसतो [ त्यास पकडावें. ] २८४ [ एक वेळ ] ताकीद दिली असूनही ती स्त्री चुकेल तर तिला शंभर [ पण ] दंड करावा; आणि [ तशाच गैर चालीने चालणारे ] पुरुषास दंड दोनशें पण; परंतु उभयतांही स्त्रीपुरुषांस मनाई केलेली असून [ जर ती व्यभिचारप्रवृत्त होतील तर ] व्यभिचाराची शिक्षा त्यांस [ केली पाहिजे. ] २८५ स्वजातींचे [ पर स्त्रीशीं व्यभिचार केल्यास ] पुरुषास उत्तमसाहस दंड; कमी जातीचे स्त्रीशी [केला असल्यास ] मध्यमसाहस [ दंड ]; स्वजातीपेक्षां उंच जातीचे स्त्रीशी व्यभिचार केल्यास पुरुषास देहांत शिक्षा; आणि स्त्रियेचे नाक कान कापावे. २८६ विवाहयोग्य झालेली सजातीय कन्या कोणी चोरून नेल्यास त्याबद्दल त्यास उत्तमसाहस दंड केला पाहिजे; विवाहयोग्य नसल्यास अधम दंड. असा अपराध वरिष्ठ जातीच्या स्त्रीचे संबंधानें केल्यास अपराध्यास वधाची शिक्षा सांगितलेली आहे. २८७ केल्यास तो स्वेच्छेनें कबूल होणाऱ्या कमी जातीचे अविवाहित स्त्रियांशी संबंध अपराध नव्हे; तसें नसल्यास दंड. जो पुरूष अविवाहित स्त्रीस दूषित करील त्याचा हात तोडावा; पण ती वरिष्ठ जातीची असल्यास अपराध्यास वधाची [ शिक्षा ]. २८८ [ खरी गोष्ट असतांही ] अविवाहित स्त्रीची अब्रू जाण्याजोगे जो शब्द बोलेल त्यानें [ शंभर ] पण दंड दिला पाहिजे; परंतु खोडसाळ रीतीनें तोहोमत घेतल्यास दोनशें पण [ दंड ]. पशुजातीचे मादीशीं व्यभिचार करणाराकडून शंभर पण दंड देवविला पाहिजे; व हलक्या प्रतीच्या स्त्रीशी किंवा गाईशी केल्यास मध्यमसाहस दंड. २८९ अवरुद्धास्त्री (पाळलेली गुलामस्त्री ), व भुजिष्या ( दुसऱ्याची राख ), यांच्याशीं व्यभिचार केल्यास सामान्यतः जरी त्यांच्याशीं गमन करण्यास प्रत्यवाय नाहीं तरी पुरुषास पन्नास पणांचा दंड केला पाहिजे. २९० दासीशीं जबरदस्तीनें व्यभिचार करणारे पुरुषास दंड दहा पण सांगितलेला आहे.