पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८ याज्ञवल्क्यस्मृति. किंवा हत्ती चोरतात, व जे बलात्काराने खून करतात, त्यांस राजानें सुळावर चढवावें ( सुळावर चढवून देहांत शिक्षा करावी. ) २७३ खिसे कापणारा व पिशव्या फोडणारा याचे [ पहिल्या अपराधाबद्दल ] त्याचे हा- ताची चिमटी ( आंगठी आणि तर्जनी) कापून टाकावी; दुसऱ्यानें [तोच ] अपराध के- ल्यास त्याचा हात किंवा पाय तोडून टाकावा. २७४ _ कमी प्रतीच्या, मध्यम प्रतीच्या, आणि उच्च प्रतीच्या वस्तूंची चोरी केल्यास [ चोरलेले वस्तूंचे ] किंमतीप्रमाणें दंड केला पाहिजे. देश, काल, [ चोराचें ] वय, व [ त्याची ] शक्ति, यांचा विचार शिक्षा ठरवितेवेळेस केला पाहिजे. २७५ चोरास, किंना खून करणारास, तो चोर किंवा खून करणारा आहे असें माहीत असून, जो अन्न पुरवील, जागा, किंवा विस्तव किंवा उदक देईल, मसलत सांगेल, सहाय- कारक वस्तु देईल, व खर्चासाठीं [ उसनवार पैसा ] देईल, त्यास उत्तमसाहस दंड केला पाहिजे. २७६ एकादे शस्त्रानें आघात केल्यास, किंवा गर्भपात करविल्याबद्दल, उत्तमसाहस दंड. पुरुषवध किंवा स्त्रीवध केल्यास [ त्यांच्या योग्यतेप्रमाणें ] त्याबद्दल उत्तमसाहस किंवा अधमसाहस असा दंड केला पाहिजे. २७७ अत्यंत दुर्वर्तनाची, पुरुषाचा घात करणारी ( ठार मारणारी वगैरे), पाण्याचे बंधारे फोडणारी, अशा स्त्रीस, ती गर्भिणी नसल्यास, गळ्यांत घोंडा बांधून पाण्यांत बुडवावें. २७८ [ लोकांस ] विष घालणारी, घरें किंवा गांवें जाळणारी, नवन्यास, गुरूस, किंवा मु- लांस ठार मारणारी जी स्त्री असेल तिचे कान, हात, नाक, व. ओठ कापून बैलांकडून ती ठार मारवावी. २७९ खून झाला असून मारणारा उघडकीस न आल्यास [ खून झालेले मनुष्याची ] दु- ष्मनी कोणाशी होती याविषयींची चौकशी करणें ती त्याचे पुत्र व संबंधी यांचेजवळ, तसेंच त्याच्या संबंधाच्या व्यभिचारिणी स्त्रियांजवळ निरनिराळी करावी. २८० [ असा शोध करावा की खून झालेला ] मनुष्य स्त्री, किंवा संपत्ती, किंवा वृत्ति यां- जविषयीं लुब्ध होता की काय, व कोणाबरोबर बाहेर ( देशांतरी वगैरे ) गेला. [ तसेंच ] जेथें खून झाला असेल त्याचे आसपास राहणारे लोकांशीं धीरे धीरे चौकशी करावी. २८१ शेतास, घरास, रानास, गांवास, गायरानास, मळणी काढण्याचे खळ्यास, जो आग लावील, व जो राजपत्नीगमन करील त्यास गवत पेटवून त्यांत जाळिलें पाहिजे. २८२