पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यवहाराध्याय.. ६७ बद्दल काम चालविण्यास मुखत्यार नेमावा. ऋत्विज, शेती करणारे लोक, व नटादि लोक यांस हाच नियम लागू आहे असें सांगितलें आहे. चोरी.. २६९ [ ज्याचे हातीं ] चोरीचा माल सांपडेल किंवा [ ज्यानें चोरी केली असा ] माग लागेल, किंवा पूर्वी केलेल्या गुन्ह्यांवरून ज्याची प्रसिद्धि असेल, किंवा जो गुप्त ठिकाणीं छपून राहत असेल अशास चोर ह्मणून [ चोरीचा पत्ता लावण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यां- नीं ] पकडावें. २६६ जे आपली जात व नांवें वगैरे छपवितात, जुवा किंवा स्त्री किंवा मद्यपान यांवि- षयीं जे फार आसक्त असतात, ज्यांचे चेहेण्यावरचें पाणी [कांहीं सवाल केल्यास ] उतरतें, व ज्यांची बोबडी वळते; अशा लक्षणांवरून ज्यांनी गुन्हा केल्याचा संशय अ- सेल त्यांसही [ त्याच रीतीनें ] पकडावें. २६७ दुसयांची द्रव्यं किंवा घरें यांची जे चौकशी करतात, लोकांचे दृष्टीस न पडतां जे राहतात, ज्यांस उत्पन्न नसून जे पुष्कळ खर्च करतात, किंवा जुन्या वस्तु जे विकतात [त्यांसही वरप्रमाणें ग्राहकांनी पकडावें. ] २६८ ज्या संशयावरून पकडले असेल त्या संशयापासून जो स्वतःस मुक्त करणार नाहीं ( संशय खोटा आहे अशी जो खात्री करून देणार नाहीं ), त्याजकडून चोरलेली वस्तु देवविली पाहिजे; शिवाय चोराचे शिक्षेस तो पात्र होईल.. २६९ चोरलेली मालमत्ता ज्याची त्यास देववून निरनिराळे जे शारीर दंड सांगितलेले आहेत त्या दंडांनी चोरास राजानें शिक्षा करवावी. ब्राह्मणानें चोरीचा अपराध केल्यास ल्यास डाग देऊन राज्याचे हद्दीचे पार घालवून द्यावें. २७० त्या अपराधाचा पत्ता लागेपावेतों खेडेगांवांत खून किंवा चोरी झाल्यास त्याचा दोषः गांवचे अधिकाऱ्यावर राहतो; गायरानांत घडलेले अपराधाबद्दल दोष त्या गायरानाचे मालकावर; गायरान शिवाय करून इतर ठिकाणी किंवा हमरस्त्यावर घडलेल्या [ गुन्ह्याब- द्दल ] दोष. ग्राहकांवर. २७१ ज्या खेडेगांवाचे हद्दींत [ चोरी होईल ] त्या गांवकऱ्यांनी किंवा [ दुसरे ठिकाण चोरी झाली असून ] ज्या गांवांत चोरीचा माग जाऊन पोंचेल त्या गांवकऱ्यांनी चोरी भरून दिली पाहिजे. [ गांवापासून ] एका कोसाहून ज्यास्ती अंतरावर चोरी झाली. असल्यास भोंवतालचे पांच गांवचे अथवा दहा गांवचेही [ लोकांनीं ] ती [ भरून दिली पाहिजे. ] २७२ बंदिग्राह (देवधर्मासंबंधी मालमत्तेची घर फोडून चोरी करणारे ), तसेंच जे घोडे