पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६ याज्ञवल्क्यस्मृति. सदोष वस्तु निर्दोष वस्तु ह्मणून विकील तर त्याबद्दल [ विकलेले वस्तूचे ] किंमतीचे दुप्पट दंड आहे. २५७ एकाद्या वस्तूची किंमत चढली किंवा उतरली आहे हें ठाऊक नसून जर कोणी व्यापारी खरेदी करील तर त्यानें किंमतीविषयी तक्रार काढू नये; तक्रार काढल्यास दिले- या किंमतीचा सहावा भाग त्यास दंड करावा. भागीदारांच्या आपसांतील संबंधाविषयीं. २५८ नफा मिळविण्याचे हेतूनें व्यापारी भागीदारीनें व्यापार करतील तर त्यांत झालेले नफ्यातोट्याचे हिस्से, एकंदर भांडवलांतील [ज्यांचे त्यांचे हिश्शांप्रमाणे] किंवा जसा ठराव असेल त्याप्रमाणे, करावयाचे. २१९ भागीदारांनी जी गोष्ट करण्याची नाहीं असें ठरविले असेल, किंवा नापसंत केली असेल, किंवा ती त्यांतील कोणी भागीदार करील, किंवा आपल्या हेळसांडपणामुळे एकंद- रीचे व्यापाराचें ( जिनसांचें वगैरे ) नुकसान करील तर झालेला तोटा त्याने भरून दिला पाहिजे. पण जो भागीदार व्यापाराचा माल [ चोरांपासून किंवा इतर ] संकटापासून बचा- वील त्यास [ बक्षीस ह्मणून ] त्या मालाचा दहावा हिस्सा मिळाला पाहिजे. २६० [ ज्या जातीचे मालाचा भाव राजानें ठरविला असेल त्या भावानें ] विक्रीच्या मा- लाचे किमतीचा विसावा हिस्सा जकात ह्मणून राजाने घ्यावा. [ जी वस्तु ] राखून ठेवण्या- बद्दल राजानें हुकूम दिला असेल ती, अथवा जी वस्तु राजाजवळ राहण्यास योग्य असेल ती [ परकीय मनुष्यास ] विकली जाईल तरी तीवर सत्ता राजाचीच. २६१ [ जो जकातीयोग्य मालाचें ] वजन किंवा माप खोटें सांगेल, जेथें जकात घेण्याची तेथून जो [ चुकवून ] जाईल, व जो कपटानें खरेदी किंवा विक्री करील, त्यास मालाचे किंमतीचे आठपट दंड केला पाहिजे. २६२ [ जलमार्गावरील ] जकातीचा अधिकारी जर जमिनीवरच्या दरानें जकात वसूल क- रील तर त्यास दहा पण दंड केला पाहिजे ; आणि आपल्या शेजारच्या विद्वान् ब्राह्मणांस श्राद्धादिकांत न बोलाविल्यास तोच दंड केला पाहिजे. २६३ देशांतरी जाऊन व्यापारी मेल्यास त्याची मिळकत त्याचे दायाद ( वारस ), बां- धव (आईकडील नातलग ), ज्ञाती, किंवा परत आलेले [ भागीदार ] यांनी घ्यावी; -यांपैकी कोणी नसल्यास राजाने घ्यावी. २६४ [भागीदारांतील जो कोणी] वांकड्या रस्त्यानें चालणारा असेल त्यास नफा न देतां [ इतर भागीदारांनीं ] काढून टाकावा. ज्यास व्यवहारज्ञान नसेल त्यानें आपल्या