पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यवहाराध्याय. ६५ असल्यास शंभर [ पण ] ; दोन पण असल्यास दोनशें [ पण ] ; त्याहून जास्ती [ किं- मत ] असल्यास दंड ज्यास्ती. २४८ [ राजाने ठरविलेले कमाल दरापेक्षां आपण ठरविलेली किंमत ] कमी किंवा ज्यास्ती आहे असें समजत असूनही, संगनमताने जे कारू ( धोबी, रंगारी, वगैरे ), आणि शिल्पी (कारागीर) याबद्दल फार भारी किंमत ठरवितील तर त्यांस उत्तमसाहस [१०८०. पण ] दंड आहे. २४९ विकण्याचा पदार्थ [ आपणासाठी मागून त्याची विक्री होऊं देण्यास ] हरकत करण्यासाठीं जे व्यापारी संगनमत करतील, किंवा तो पदार्थ अयोग्य किंमत घेऊन विंक - तील, तर त्यांस उत्तमसाहस ( ह्मणजे १०८० पण ) दंड ठरविलेला आहे. २५० राजाने ठरविलेले दराप्रमाणे दररोज वस्तु विकाव्या किंवा विकत घ्याव्या ; अशा रीतीनें मिळविलेला नफा व्यापाऱ्यांस श्रेयस्कर होय असें ह्मटलेले आहे. २९१ विक्री लागलीच ( खरेदीचेचं दिवशीं ) झाल्यास व्यापाऱ्याने स्वदेशांतील [ खरेदी केलेले ] जिनसावर [ शंकडा ] पांच व परदेशांतल्या जिनसावर दहा नफा ह्मणून घ्यावा. २५२ [ जिनसाचे दर राजानें ] अशा रीतीने ठरवावे कीं, जिनसाची मूळ किंमत व शिवाय खर्च हे जाऊन विकणारास व गि-हाइकास फायदेशीर पडावे. २५३ विकण्यालायक वस्तूची किंमत घेतली असून विकलेली वस्तु गि-हाइकाचे ताब्यांत विकणारा देणार नाहीं तर तीवरील व्याजासुद्धां ( नफा किंवा व्याज झालें असेल त्यासुद्धां ) ती त्याजकडून देववावी; आणि [ गिन्हाइक जर परदेशांतील असेल तर ] त्या वस्तूवर परदेशांत जो नफा होण्याजोगा होता तोही शिवाय त्यास देववावा. २५४ माल खरेदी करून नंतर तो घेण्याची खरेदीदाराची इच्छा नसल्यास तो माल पुनः विकावयास हरकत नाहीं. पहिल्याने विकत घेणारास माल [ देत असून ] तो न घेईल आणि नंतर त्या मालाचें नुकसान होईल तर, विकत घेणाराची [ कबुलातीप्रमा- ] माल ताब्यांत न घेण्यांत चुकी असल्यामुळे, जो तोटा होईल तो विकत घेणारानें सोसला पाहिजे. २१५ विकलेला माल विकत घेणाराने मागितला असून त्याला तो न दिल्यास, आणि राजा किंवा अग्निजलादिकांपासून मालाचें नुकसान झाल्यास [ झालेला ] तोटा विकणारा- वर पडेल. २५६ एक वेळ एकास विकलेली वस्तु [ विकणारा ] दुसन्यास तो पुनः विकील, किंवा