पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४ याज्ञवल्क्यस्मृति. पितापुत्रांचे भांडणांत जो साक्षी होईल त्यास दंड तीन पण; [ परंतु ] त्या कलहांत जो जामीन होईल त्यास चोवीस पण. २३९ खोटी तराजू जो 'चालू करण्यासाठी देतो, खोट्या राजाज्ञा प्रसिद्ध करतो, खोटी मापें व खोटी नाणी जो व्यवहारांत आणण्यास देतो, व जो तीं [ खोटी अशीं ठाऊक अमून ] व्यवहारांत चालवितो, ते अत्यंत भारी दंडास पात्र होतात. २४० नाण्यांची परीक्षा करणारा [ सराफ ] जर खऱ्या नाण्यास खोटे ठरवील व खोट्यास खरें ठरवील, तर त्यास उत्तम साहस दंड ( सर्वांत मोठा दंड ) केला पाहिजे. २४१ ढोंगी वैद्य ( ज्यास वैद्यक्रिया माहीत नसून आपण वैद्य ह्मणून खोटसाळपणानें ढोंग माजवील आणि ) . पशुपक्ष्यादिकांस, [सामान्य ] लोकांस, किंवा राजाचे अधिकाऱ्यांस औषधोपचार करील, तर त्यास अनुक्रमानें सर्वात कमी, मध्यम, आणि अत्यंत मोठा दंड केला पाहिजे. २४२ . ज्यास प्रतिबंधांत ठेवणे रास्त नाहीं, अशास कोणी प्रतिबंधांत ठेवितो तर त्यास, किंवा ज्या कोणास प्रतिबंधांत ठेवणे योग्य असून, चौकशी न करितां सोडून देतो त्यास उत्तम साहसाचा दंड केला पाहिजे. २४३ [ खोट्या ] वजनानें किंवा मापानें विकलेले वस्तूंतून [ द्यावें त्यापेक्षां ] एक अष्ट- मांश जो कमी देईल त्यास दोनशे पण दंड केला पाहिजे. पण या प्रमाणाचे वर किंवा कमी ज्या मानानें कमी दिलेलें असेल त्याचे प्रमाणानें [ कमी किंवा ज्यास्ती दंड केला पाहिजे. ] २४४ विकण्याचे औषध, तेल, तूप, मीठ, सुगंधी पदार्थ, धान्य, गुळी साखर, व असे दु- 'सरे पदार्थ यांत कमी प्रतीचे पदार्थ मिसळून जो विकील त्यास सोळा पण दंड केला पाहिजे. २४५ माती, चर्म, हिरे, सूत, लोखंड, लांकूड, साल किंवा कापड हीं कमी प्रतीचीं असून [ कांही करामतीनें ] उंच प्रतीची [दिसण्याजोगी] केल्यास विकण्याचे पदार्थाचे किंमतीचे आठपट दंड [असें करणारास ] केला पाहिजे. २४६ [ उंच प्रतीचे किंमतीचा डबा दाखवून ] त्याचे मोबदला [ कपट करून खोटा मोहोर- बंद डबा जो कोणी तारण ह्मणून ठेवील, किंवा विकील, किंवा खऱ्या [पदार्थानें भरलेल्या ] वस्तूबद्दल खोटी बनावट वस्तु तारण ह्मणून देईल अथवा विकील तर त्यास दंड [ खाली लिहिल्याप्रमाणें करावा. ] २४७. [गिऱ्हाइकास ठकवून विकलेले वस्तूची किंवा ठकवून गहाण ठेवलेले वस्तूची किंमत ] एक पणापेक्षां कमी असल्यास त्याबद्दल पन्नास पण [ दंड ], [ किंमत ] एक पण