पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यवहाराध्याय. मारामार. मारामारीचे अपराधांत साक्षी नसल्यास मारामार घडल्याचा निर्णय [ अंगावरी- ल] खुणा (वळ, डाग, वगैरे), आनुषंगिक अनुमानें, लोकवार्ता, आणि अशा प्रकारच्या इतर पुराव्यावरून करावा ; कारण कदाचित् [ अंगावरील ] खुणा बनावट केल्या अस- तील [ या भयास्तव इतर पुरावा घेतला पाहिजे ]. २१२ राखाडी, चिखल, धुरळा कोणाचे आंगावर फेंकल्यास त्याबद्दल दहा पण दंड क- रावा असें ह्मटलेलें आहे ; कोणाचे आंगावर अश्रु, श्लेष्मादि अपवित्र वस्तु टाकल्यास, खोट मारल्यास, किंवा थुंकी टाकल्यास २० पण दंड. २१३ सवर्णपुरुषाचे संबंधानें मात्र असा प्रकार केल्यास हा [ वर सांगितलेला ] नियम समजावा. पण असा प्रकार परस्त्रीवर किंवा श्रेष्ठ पुरुषावर केल्यास [ त्याबद्दल दड ] दुप्पट ; आपल्याहून कमी योग्यतेचे पुरुषावर केल्यास अर्धा दंड; परंतु बुद्धिभ्रंशाचे का- रणानें, दारू पिऊन मस्त झाल्यामुळे, किंवा अशाच प्रकारचे इतर सबबीनें अशी गोष्ट घडल्यास त्याबद्दल कांहींच दंड नाहीं. २१४ शरिराच्या ज्या अवयवानें, ब्राह्मण शिवाय करून, जो कोणी पुरुष ब्राह्मणास इजा करील त्याचा तो अवयव तोडून टाकावा. [ मारण्यासाठी एकादा अवयव किंवा शस्त्र नुसतें] उचलल्यास सर्वांत अति लहान सांगितलेला आहे तो दंड करावा; ब्राह्मणास शस्त्राचा स्पर्श केल्यास त्याचे अर्ध्यानें दंड. २१५ [ मारण्याची भीति दाखवून ] हात किंवा लाथ उगारल्यास त्याबद्दल शिक्षा अनु- क्रमें दहा आणि वीस [ पण दंड केला पाहिजे ]. कोणत्याही वर्णाच्या दोघां मनुष्यांनी एकमेकांवर शस्त्रें उगारल्यास त्याबद्दल मध्यमसाहसाचा दंड सांगितलेला आहे. २१६ [ कोणाचा ] पाय, केश, वस्त्र किंवा हात धरून झटका देऊन जोराने ओढल्यास [ओढगारास त्याबद्दल ] दहा पण [ दंड करावा ]. ज्याच्या त्याचे वस्त्रानें मुसक्या बां- धलेल्या असून त्यास जोरानें कोणी ओढील किंवा त्यावर पाय देईल तर [ तसें करणा- रास ] शंभर पणांचे दंडाची शिक्षा. २१७ काठी किंवा दुसऱ्या कशानें मारून कोणी माणूस दुसऱ्यास इजा करील, पण त्या- पासून रक्तस्राव होणार नाहीं तर त्याबद्दल [ इजा करणारास ] बत्तीस पण दंड केला पाहिजे; पण रक्तस्राव झाल्यास त्याचे दुप्पट दंड. २१८ [ एकानें दुसन्याचा ] हात, किंवा पाय मोडल्यास, किंवा दांत पाडल्यास, मध्यम साहसाचा दंड त्यास करावा. कान किंवा नाक तोडल्यास, [ तसेंच ] आंगावरील व्रण फोडल्यास किंवा मरेमरेतो मारल्यास त्यास मध्यम साहसाचा दंड करावा. . २१९