पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२ याज्ञवल्क्यस्मृति. चालणे, खाणें, किंवा बोलणे, हीं कोणी एकानें दसऱ्याची बंद केल्यास डोळ्यांस इजा केल्यास, व अशीच इतर इजा केल्यास; मान, हात, आणि मांडी मोडल्यास ; [ त्यास दंड ] मध्यमः साहसाचा करावा.. २२० अनेक मनुष्यांनी मिळून एकाकी माणसास मारहाण केल्यास त्यास [प्रत्येकीं ] दंड पूर्वी सांगितल्याचे दुप्पट मारामारीचे प्रसंगी जें कांहीं घेतलेले असेल तें ज्याचे त्यास परत दिलें पाहिजे ; त्याशिवाय [ त्या वस्तूचे किंमतीचे ] दुप्पट दंड [ दिला पाहिजे]. २२.११ [ मारामारीचे प्रसंगीं ] एकानें दुसऱ्याचे [ शरिरास ] दुखापत केल्यास ती बरी होण्यासाठी लागेल तो खर्च त्यानें ( दुखापत करणारानें ) दिला पाहिजे; शिवाय मारा- मारी केल्याबद्दल मारामारीचे अपराधास अलाहिदा - ठरविलेला. दंड दिला पाहिजे... २२२: [ कोणाचे ] भिंतीवर टोले मारल्यास, तिला छिद्रे पाडल्यास, किंवा भेगा पाडल्या- स किंवा ती पाडल्यास त्या अपराधाबद्दल, ' अनुक्रमानें ' पांच, दहा, वीस आणि पसतीस पण दंड [ तसे करणारास ] करावा; व [ दंड देऊन ] शिवाय त्यानें नुकसान भरून दिले पाहिजे. २२३ जेणेंकरून शरिरास इजा होण्यासारखी आहे अशी एकादी वस्तु [ दुसऱ्याचे ] घरांत टाकल्यास [ तसें करणारास ] सोळा पण दंड करावा ; आणि जिवाची हानि हो- ण्यासारखी वस्तु [ टाकल्यास ] त्याबद्दल मध्यम साहस दंड करावा... २२४ः लहान सहान चतुष्पाद पशूंस [१] इजा दिल्यास, [२] त्यांचा रक्तस्राव के-- ल्यास, [ ३ ] त्यांच्या शाखा ( शिंगे वगैरे), किंवा [ ४ ] अवयव तोडल्यास, त्याबद्द - ल दंड २, ४, ६, व ८ पण असा अनुक्रमें केला पाहिजे.. २२५. पूर्वोक्त [ पशूंचे ] शिश्न कापल्यामुळे ते मेल्यास त्यांची किंमत देववून [ शिवाय ] मध्यमसाहसदंड देवविला पाहिजे. [ अशा प्रकारची अपक्रिया ] उंच जातींचे चतुष्पाद जनावरांस केल्यास त्याचे दुप्पट दंडाची शिक्षा केली पाहिजे. २२६: कलमी झाडांच्या अथवा ज्यांवर उपजीविका चालते अशा वृक्षांच्या शाखांस किं-- वा खोडांस उपद्रव दिल्यास किंवा ते वृक्ष उपटून टाकल्यास त्याबद्दल दंड २० पण, ४० पण, व ८० पण असा अनुक्रमें करावा.. २२७- [१] होमादि स्थानाजवळचे व समाधिजवळचे, स्मशानभूमीवरील, सीमेवरील, पु- ण्यभूमींतील, व देवळा जवळचे वृक्ष, तसेंच ज्यांची ख्याति आहे असे प्रसिद्ध वृक्ष यांस जो इजा करील त्यास मागच्या श्लोकांतील दंडाच्या दुप्पट दंड.. २२८ . गुल्म (जाळी), गुच्छ (झुडुप), सूप (लहान झाड), लता (वेली), प्रतान (ज्यास