पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

याज्ञवल्क्यस्मृति. कमी वर्णाचे [ मनुष्यास ] शिवीगाळ दिल्यास [ मागील श्लोकांत सांगितलेले दंडाचे ] अर्धा दंड (साडेबारा पण ). परस्त्रीस शिवीगाळ दिल्यास किंवा वरिष्ठांस शिवी- गाळ दिल्यास त्याचे दुप्पट दंड ( पन्नास पण ). [ अन्यत्र ठिकाणी ] दंडाची रक्कम [ शिवीगाळ देणारा व दिलेल्या पुरुषांचे ] उच्चनीच वर्णानुरोधानें, किंवा उच्चनीच जाती- प्रमाणे ठरविण्याची आहे. २०६ कमी वर्णाच्या माणासानें उच्च वर्णाचे पुरुषास शिवीगाळ केल्यास [अनुक्रमें दुप्पट]: [ क्षत्रियानें ब्राह्मणास ] ( शंभर पण ) ; आणि तिप्पट ( वैश्याने ब्राह्मणास) (दीडशे पण ) दंड सांगितला आहे; आणि [ ज्यास शिवीगाळ दिली असेल तो कमी वर्णाचा असल्यास त्याचे . वर्णाप्रमाणें ] एक कमी वर्णाबद्दल अर्धप्रमाण दंड [ असा ] कमी करावा.* २०७ “भुज, मान, डोळे, किंवा मांडी मोडीन" असें भय दाखवून कोणी शिवीगाळ करील तर त्यास शंभर पण दंड करावा; पण पाय, नाक, कान, हात इत्यादि अवयव [ मोडून टाकण्याच्या भीतीसह [शिवीगाळ केल्यास ] त्याचे अर्ध्याइतका दंड करावा. २०८ पण [ भयप्रदर्शनसहित ] शिवीगाळ अशक्त माणसाने [ ह्मटल्याप्रमार्णे करण्याचें सामर्थ्य नसेल त्यानें ] केल्यास त्यास दहा पण दंड करावा; परंतु [लटल्याप्रमाणें कर- ण्यास सामर्थ्य असलेल्या ] माणसाने असें केल्यास [ पूर्वी सांगितलेला दंड करून ] शि- वाय [ भीति घातलेले माणसाचे ] रक्षणासाठीं जामीनही घ्यावा. २०९ पंचमहापातकांचा आळ घालून शिवीगाळ केल्यास मध्यम साहसास जो दंड तो करावा. उपपातकाचा आळ घालून शिवी दिल्यास सर्वांत अति लहान साहसास सांगित- लेला दंड त्यास करावा. २१० तीन वेद जाणता ब्राह्मण, राजा, किंवा देव यांस जो शिवीगाळ करील त्यास अ- त्यंत मोठा दंड व्हावा. जातींत किंवा पूग [ संघ ] मंडळीस [ शिवीगाळ ] केल्यास मध्यम साहसास जो दंड आहे तो दंड करावा; एकादें गांव किंवा देश यांस उद्देशून शिवीगाळ केल्यास सर्वांत लहान साहसास सांगितलेला दंड करावा. २११

  • [ याचा फलितार्थ असा :- शुद्राने ब्राह्मणास शिवीगाळ दिल्यास त्याबद्दल त्यास शारीर शिक्षा किंवा जिव्हाच्छेद; त्याच अपराधाबद्दल वैश्यास दीडशे पण; आणि क्षत्रियास शंभर पण दंड. शूद्र वैश्यांनीं क्षत्रियास शिवीगाळ केल्यास त्यांस अनुक्रमें दीडशे व शंभर दंड. शूद्रानें वैश्यास शिवीगाळ केल्यास शंभर पण दंड. याचे उलट प्रकार झाल्यास, क्षत्रियवैश्यशूद्रांस शिवीगाळ केल्यास, त्याबद्दल अनुक्रमानें पंन्नास, पंचवीस, आणि साडेबारा पण दंड. क्षत्रियाने वैश्यशूद्रांस शिवीगाळ केल्यास अनुक्रमानें पंन्नास, पंचवीस पण; वैश्याने शूद्रास शिवीगाळ केल्यास पंन्नास पण दंड ].