पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यवहाराध्याय. १९ निघण्याचे ठरल्यानंतर जर तो मध्ये अडथळा घालील तर ठरविलेले मजुरीचा सातवा हिस्सा त्यास दंड करावा; व रस्त्यांतून मधूनच सोडून गेल्यास चौथा हिस्सा दंड करावा. [ जो कोणी धन्यास ] अर्ध्या रस्त्यावरच सोडून जाईल त्याजकडून सर्व मजुरी परत देवविली पाहिजे; तसेंच [ धन्यानें ] चाकरास सोडून दिल्यास त्या [ धन्याक- डूनही ] त्याचप्रमाणे मजुरी देवविली पाहिजे. जुवा खेळणें व शर्यत बांधणें. १९८ जुबा खेळण्यांत शंभर [ किंवा अधिक पणांची ] पैज मारलेली असल्यास जुव्याचे घराचे मालकाने शेंकडा पांचप्रमाणें जुवा जिंकणाऱ्याकडून घ्यावे; अन्यत्र शेंकडा दहांप्रमाणे.. १९९ राजाकडून स्वतःचें संरक्षण होत असतां आपल्या उत्पन्नांतून जो हिस्सा राजास देण्याचा कबूल केलेला असेल तो हिस्सा [ जुव्याच्या घराचे मालकानें ] राजास द्यावा. जिं- कलेला पैसा पैज मारणाराकडून उगवून त्याने जिंकणारास द्यावा; व निरंतर शांत राहून त्यानें सत्य बोलावे. २०० जुन्याचे घराचे मालकाचे समक्ष जुवा खेळणारे मंडळींत उघडपणें जो पैसा जिंक- लेला असेल, त्यापैकी राजाचा हिस्सा राजास मिळाला असेल तर, तो पैसा [ ज्याकडून येणें त्याकडून ] देवविला जाईल; नाहीं तर देवविला जाणार नाही... २०१ जुवा खेळण्याचे कामासंबंधाचे प्रकरणांत देखरेख करणारे व साक्षीदार खुद्द जुवा खेळणारेच असले पाहिजेत. कपटानें फांसा टाकील किंवा मणिमंत्रादिकांनी फसवून खेळेल, त्यास राजानें डाग देऊन हद्दपार करून दिलें पाहिजे... २०२ चोर लोकांस उघडकीस आणण्याचा एक उपाय ह्मणून जुव्याचे. कामाची देखरेख एका पुरुषाकडेसच ठेवावी.. समाव्हयास (ह्मणजे बक्षीस लाऊन लढविणें वगैरे संबंधाचे सर्व बाबींत) हाच नियम लागतो असें समजावें. शिवीगाळ.. २०३ ज्यास एकादा शारीर अवयव अथवा ज्ञानेंद्रिय कमी असेल किंवा जो रोगपीडित: असेल त्याचा उपहास खऱ्या, खोट्या, किंवा लाक्षणिक प्रकारचे भाषणांनी जो करील त्यास साडेतेरा पण दंड केला पाहिजे... 66 २०४ 'तुझ्या बहिणीशी किंवा मातेशी जार कर्म करीन " अशा भाषणांनी जो दुस- यस शिवीगाळ करील त्याजकडून राजानें पंचवीस [ पण ] दंड देववावा. २०९