पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ याज्ञवल्क्यस्मृति त्यानें त्या समूहास सादर करावें. त्यानें स्वसंतोषानें तें न दिल्यास त्याचे अकरापट त्या- जकडून देवविलें पाहिजे. १९० स्वधर्म जाणणारे, शुद्धवर्तन करणारे, व निर्लोभी पुरुष समूहाचे कार्याचा विचार ( कारभार ) करण्यासाठी नेमावे; व सर्व समूहाचे हितासाठी जसें ते सांगतील तसें अमलांत आणावे. १९१ श्रेणी, नैगम, पाखंडी, व गण ( इत्यादिक नांवाच्या प्राचीन काळच्या सभा किंवा मंडळ्या ) या सर्वांस वर सांगितलेला नियम एकसारखाच लागतो. त्यांचेमध्ये ज्या तऱ्हा व भेद असतील ते तसेच राजानें राखावे वं प्राचीन काळापासून धंदे, उद्योग, वगैरे निर्वाहाचीं साधनें असतील ती कायम ठेवावी. कामाबद्दल मजुरी न देणें. १९२ मजुरी आगाऊ घेऊन कबूल केलेलें काम जो कोणी सोडून जाईल त्यानें [ घेतलेले मजुरीचे ] दुप्पट रक्कम [ धन्यास ] दिली पाहिजे; पण जेव्हां [आगाऊ मजुरी दिलेली ] नसेल तेव्हां ठरविलेली मजुरी [ त्याजकडून ] देवविली पाहिजे. नोकरांचे धंद्याचे किंवा कामाचे हत्यारांचे रक्षण त्यांनीच केलें पाहिजे. १९३ काय मजुरी देण्याची याचा ठराव केल्यावांचून जर कोणी माणूस दुसऱ्यास कोण- त्याही जातीचे व्यापारांत, पशु, किंवा धान्य यासंबंधाचे धंद्यांत, कामास लावील तर त्या धंद्यांत जो धन्याला फायदा होईल त्याचा दशांश [ कामास लावलेले माणसास ] धन्याक- डून राजानें देवविला पाहिजे. १९४ वेळचे वेळेस न जपल्यामुळे, योग्य ठिकाणीं न गेल्यानें, किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणामुळे जर कोणी नोकर माणसानें करावा तसा नफा [ धन्यास ] करून दिला नाहीं, तर त्यास [ धन्याचे इच्छेनुरूप मजुरी ] मिळावी. परंतु [ जो योग्य नफा व्हावा त्या- पेक्षां ] जास्ती फायदा धन्याचा केल्यास [ ठरविलेल्या मजुरी वर ] कांहीं तरी जास्त त्यास देववावें. १९९ दोघां नोकरांनीं कांहीं काम करण्याचा ठराव असून त्यांपैकी एकास कांहीं अड- चण आल्यामुळे दुसरा एकटाच जितकें काम करील त्याबद्दल वेतन पंच ठरवितील तें त्यास द्यावें. कबुलातीप्रमार्णे काम झाल्यास ठरविलेली [ मजुरी दोघांस मिळून दिली पाहिजे. ] १९६ ज्या नोकराजवळ व्यापाराकरितां कांहीं सामान दिलें असेल तें अग्निजलादि व रा- जा यांच्या उपद्रवावांचून इतर कारणानें हरवेल किंवा नाश पावेल, तर त्याजकडून तें भरून देववावें. बाहेर निघण्याचे शुभ प्रसंगी जो नोकर धन्यास अडथळा करील त्याज- कडून ठरलेले मजुरीचे दुप्पट दंड घ्यावा. १९७