पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यवहाराध्याय. चाकरी करण्याचे करार मोडणें. ५७ जबरदस्तीनें ज्यास दास ( गुलाम ) केलें असेल त्यास व नोरांनीं ज्यास विकलें त्यास [ गुलामगिरीपासून ] मुक्त केलें जातें. [ ज्या गुलामानें ] आपल्या धन्याचा प्राण राखिला असेल [ तो मुक्तनेस पात्र होय. ] अन्नवस्त्र घेतल्याबद्दलचा खर्च किंवा खंडणी [ आपल्या धन्यास ] दिली ह्मणजे गुलामास मुक्त होण्याचा हक्क आहे. १८२ संन्यासग्रहण (चतुर्थाश्रम ) स्वीकारून जो आपल्या आश्रमापासून पतित होतो तो जन्मपावेतों राजाचा गुलाम होतो. जर दास [ धन्यापेक्षां | कमी वर्णाचा असेल तर मात्र दास्यत्व कायदेशीर होते; तो [ धन्यापेक्षां ] उच्च वर्णाचा असल्यास कायदेशीर माहीं. १८३ [ कारागिरादिकांचे हाताखालचा ] कामशिकाऊ विद्यार्थी, त्याची यांत्रिक कला शि- कण्याचे काम पुरे झाले तरी, ठरविलेले मुदतीपावेतों त्यानें गुरूजवळ राहिलेच पाहिजे; [ दरम्यान ] त्यानें अन्नवस्त्र गुरूपासून घेऊन त्याच्या कौशल्याच्या श्रमापासून होईल तो फायदा गुरूस द्यावा. ठरावाबाहेर वर्तणूक. १८४ आपल्या राजधानीचे शहरांत एक वाडा बांधून तीन वेदांत प्रवीण अशा ब्राह्मणां- ची सभा स्थापित करून व त्यांचे चरितार्थाची संस्था करून राजाने त्यांस सांगावें कीं, धर्माचे पालन करा ". 66 १८५ स्वधर्माशी ज्यांचा विरोध नाहीं असे जे सामयिक धर्म ( परंपरागत रीतीभाती, आचार, व वहिवाटी यांचे संबंधाचे नियम ) असतील व राजानें स्थापित केलेले जे धर्म ( कायदेकानू ) असतील त्यांचे संरक्षण यत्नानें करावें. १८६ जनसमूहाच्या मालमत्तेचा जो अन्यायाने अपहार करील त्याची आणि त्यांचे किंवा राजाचे [ परंपरागत स्थापित झालेले ] नियम जो मोडील त्याची सर्व मालमत्ता जप्त करून त्यास राजानें राज्याचे हद्दीपार घालवून द्यावे. १८७ समूहापैकीं जे पुरुष [ त्या सर्व ] समूहाचे बण्यासाठी आज्ञा देतात त्यांच्या त्या आज्ञा सर्वांनी मान्य केल्या पाहिजेत.. त्या समूहापैकी जो कोणी अशा प्रकारची आज्ञा मानणार नाहीं त्याजकडून कमीत कमी जो दंड असेल तो देवविला पाहिजे. १८८ समूहाचे कार्यासाठीं ( हरकोणतेही सार्वजनिक कामासाठी) जे राजाकडे आले असतील त्यांचे काम संपल्यावर त्यांस देणग्या देऊन व आदरसत्कार करून राजानें त्यांस निरोप द्यावा. समूहासाठीं (सार्वजनिक कामासाठी ) एकच पुरुष गेला असून त्यास जे मिळेल तें १८९