पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६ याज्ञवल्क्यस्मृति. एका खुराचे उनाड जनावराबद्दल धन्याने चार पण [ दंड] दिला पाहिजे; मनुष्या- बद्दल पांच पण; लैस किंवा रेडा, उंट, गाय किंवा बैल, अशांबद्दल प्रत्येकी दोन पण; आणि शेळी किंवा मेंढीबद्दल पाव पण. देणगी परत घेण्याविषयीं. १७४ घराण्यांतील मालमत्तेचें नुकसान न होतां स्वस्त्री व पुत्र हीं शिवाय करून, कोण- तेही वस्तूचें दान करण्याचा अधिकार आहे. संतति असल्यास मनुष्यानें आपले सर्वस्वाचें दान करूं नये. तसेंच ज्यास जी वस्तु देण्याबद्दल वचन दिलें असेल त्यावांचून ती इतरास देऊं नये. १७५ दान घेणें तें प्रसिद्धपणें घेतलें पाहिजे ; विशेषतः स्थावराचा प्रतिग्रह प्रसिद्धपणेंच झाला पाहिजे. देण्यास जें कबूल केलेले असेल तें दिलें पाहिजे. दिलेलें दान पत घेऊं नये. खरेदी रद्द करणें. १७६ बीजें, लोखंड, ओझें वाहणारी जनावरें, दागदागिने, दासी, व दूध देणारी जनावरें, व पुरुष, हीं [विकत घेणारास ] त्यांची परीक्षा करण्यासाठी अनुक्रमानें दहा, एक, पांच, सात दिवस, एक महिना तीन दिवस, आणि एक पंधरवडा, याप्रमाणें मुदत दिलेली आहे. १७७ विस्तवांत घातल्याने सोन्याचें वजन कमी होत नाहीं ; रुपें शेंकडा दोन पलें कमी होतें ; कथील आणि शिसें शेंकडा आठ; तांबें शेंकडा पांच ; आणि लोखंड शेंकडा दहा. १७८ लोकरीचे आणि कापसाचे सुतांचे संबंधानें दरशेकडा दहा पलांची वाढ येते; [ त- सेंच ] मध्यम प्रतीचे [ कापडांत ] शेंकडा पांच ; व तलम [ कापडांत शेंकडा ] तीन पर्ले वाढतात. १७९ कलाबतूचे कशिद्याचे कापडांत व केंसांचे कापडांत तिसावे हिश्शाइतकी तूट दिली जाते. रेशमाचे कापडांत किंवा वल्कलांत तूट किंवा वाढ कांहीं होत नाहीं. १८० काल व देश यांचा विचार करून [ तक्रारींतील ] वस्तूचा वापर, तिचा टिकाऊपणा किंवा चिनटिकाऊपणा यांचा पक्केपणी पुरावा पाहून, [ अशा कामांत ] जे चांगले माहित- गार असतील त्यांनीं योग्य ह्मणून जेवढे नुकसान ठरविलें जाईल तेवढे नुकसान, जेव्हां एकादे वस्तूची खराबी झाली असेल तेव्हां [ कारागिराकडून ] देववावें. १८१