पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यवहाराध्याय. ५५ ज्यांस परत दिली पाहिजेत. ज्यास राखणावळ दिली जाते त्याचे हयगयीनें जर जनावर जाया झाले किंवा हरवलें तर त्यापासून ते भरून देववावें. १६४ गुराख्याच्या चुकीनें जर जनावर नाहींसें होईल तर त्याबद्दल त्याला साडेबारा पण दंड सांगितलेला आहे; शिवाय त्या जनावराची किंमत पंच ठरवितील तो त्यानें धन्यास दिली पाहिजे. १६५ राजाचे आज्ञेनें किंवा गांवकऱ्यांचे इच्छेनुरूप किंवा जमिनीचे सोईप्रमाणें गुरें चरण्यासाठी गायरान अलाहिदा सोडावें. गवत, सरपण, आणि फुलें हीं हर कोणत्याही • ठिकाणांतून मालकीचे नात्यानें द्विजांनी न्यावी. १६६ खेडेगांवापासून शेताचें अंतर १०० धनुष्यां (४०० हातां ) पेक्षां कमी नसावें; मोठे गांवापासून दोनशे धनुष्यें, आणि शहरापासून चारशे धनुष्यें. हक्क नसून केलेली विक्री. १६७ आपल्या नकळत दुसऱ्यानें आपल्या मालाची विक्री केल्यास आपल्यास त्याचा ताबा मिळेल. विकत घेणारानें गुप्तपर्णे विकत घेतल्यास तो दोषी होईल. ज्या मनुष्यास ती वस्तु मिळविण्याची शक्ति नाहीं अशा मनुष्यापासून, किंवा गुप्तपर्णे, योग्य किंमतीहून कमी किंमतीस, किंवा अवेळीं जर माल विकत घेतला, तर विकत घेणारा चोराप्रमाणे समजावा. १६८ आपली ठरवलेली किंवा चोरीस गेलेली वस्तु [ विकलेली ] आढळेल तर माल- कार्ने विकणारास कैद करवावें. [ अधिकारी ] दूर असल्या कारणानें गैरसोय होत असेल तर, किंवा तसें करण्यास वेळ नसेल तर, खुद्द धन्याने जातीनें त्यास कैद करून त्यास [ योग्य अधिकाऱ्याचे ] स्वाधीन करावें. १६९ [ चोरलेली वस्तु ] . विकणारा दाखवून दिल्यास विकत घेणारास सोडून द्यावें; विकणारापासून मालकास त्याची वस्तु परत मिळावी, राजात दंड मिळावा, व विकत घेणाराने दिलेली किंमत परत त्यास मिळावी. १७० हरवलेले किंवा चोरीस गेलेले वस्तूचे मालकीची शाबिती ताब्यावरून किंवा हक्क दाखवून मालकाने केली पाहिजे. त्याचेकडून तशी शाबिती न झाल्यास [ त्या व- स्तूचे ] पांचवे हिश्शाइतका दंड त्यानें राजास द्यावा. १७१ आपली चोरलेली किंवा हरवलेली वस्तु दुसऱ्याकडून जो कोणी परत घेईल आणि त्याबद्दलची खबर राजास न देईल तर त्यास ९६ पण दंड करावा. १७२ जकातीचे अधिकारी किंवा रखवालदार यांस जर हरवलेली किंवा चोरीस गेलेली वस्तु सांपडेल आणि एक वर्षाचे आंत तीबद्दल मागणें केलें जाईल, तर ती धन्यास परत मिळाली पाहिजे; त्यापुढें तो राजानें ठेवावी. १७३