पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ याज्ञवल्क्यस्मृति. होत नसल्यास व त्यापासून [ इतरांस ] फायदा होत असेल, तर त्यास जमिनीचे माल- कानें प्रतिबंध करूं नये. [ तसेंच ] विहिरीसाठी थोडी जागा पुरत असेल व तीपासून पुष्कळ पाणी [ लोकांस ] मिळत असल्यास [ तीस प्रतिबंध करूं नये ]. १.१६. जमिनीचे मालकास कळविल्यावांचून त्याचे शेताभोंवतीं कोणी दुसऱ्याने बांध घातल्यास त्यापासून जो फायदा होईल त्यावर हक्क जमिनीचे मालकाचा आहे; मालक नसल्यास राजाचा. १.१७ कोणा माणसानें [ शेताची लागवड करण्याचे ] कबूल केलेले असून जमिनीची उखळ केल्यानंतर तो स्वतः किंवा दुसऱ्याच्यां मार्फतीने लागवड करणार नाहीं, तर त्या जमिनीत जितकें उत्पन्न होण्यासारखें असेल त्याचे इतकी रक्कम त्याजकड़न स्वामीस देववावी; वं ती जमीन लागवडीसाठी दुसन्यास द्यावी. - धनी व गुराखी यांचे दरम्यानचे तंटे.. १९८ ह्मशीनें धान्याची ( पिकाची ) नुकसानी केल्यास तिच्या धन्याकडून [ प्रत्येक शीबद्दल ] आठ मासे ( पण ह्मणून जें नाणें होतें त्याचा विसावा हिस्सा ) दंड घ्यावा गाईनें नुकसान केल्यास धन्याकडून त्याचे निम्यानें, व शेळी किंवा मेंढीचे धन्याकडून: त्याचे अर्ध्यानें. ११९. [ पुनः ] पीक खाऊन शिवाय जनावरें जर शेतांत बसतील, तर वर सांगितलेले दंडांचे दुप्पट दंड घ्यावा. जेथें गवत किंवा सर्पण सांठविलेले असेल तेथें पूर्वसम ( ह्मणजे द्विगुण ) समजावा; वाशीबद्दल जो दंड तोच गाढव किंवा उंटाबद्दल समजा- वा. १६०. जितके धान्याची नुकसानी झाली असेल तितकें धान्य शेताचे मालकास दिलें पा- हिजे; व गुराख्यास फटक्यांची शिक्षा द्यावी. याशिवाय पूर्वी [१९५ श्लो. ] सांगि- तल्याप्रमाणें धनी दंडासही पात्र आहे. १६१: शेत जर रस्स्याचे बाजूस असून किंवा गांवचे गायरानाचे जवळ असून बुद्धया' शेत खावविण्याचा त्याचा इरादा नसतां त्याचे ताब्यांतील गुरें त्या शेतांत जाऊन पीक खातील, तर गुराखी [ किंवा धनी ] अपराधी नाहीं. पण त्यानें बुद्धिपुरःसर लोकांचे. शेतांत गुर्रे जाऊं दिल्यास त्यास चोराप्रमाणे शिक्षा करावी. १६२ संतति चालण्यासाठीं राखलेला पोळ, [पितरांचे तृप्त्यर्थ डाग देऊन] सोडलेली जना- वरें, नुकतीच व्यालेली जनावरें, चुकलेली वगैरे जनावरें, ज्यांस राखता असूनही जी अग्नि- जलादिक व राजे यांजकडून पिडलेली जनावरें [ ह्यांबद्दल दंड न घेतां ] सोडावीं. १६३ सकाळीं जितकीं जनावरें ताब्यांत घेतली तितकीच संध्याकाळी गुराख्याने ध-