पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यवहाराध्याय. ५३ दुष्काळांत, धर्मकार्यासाठीं, व्याधिग्रस्त असतां, किंवा प्रतिबंधांत असतां नव- यानें आपल्या बायकोचें घेतलेलें स्त्रीधन, त्याची इच्छा नसल्यास, परत दिलेच पाहिजे असें नाहीं. १४७ एक बायको असून नवऱ्यानें दुसरें लग्न केल्यास पहिल्या बायकोस, तिला स्त्री- धन दिलेलें नसेल तर, दुसऱ्या लग्नास जितका खर्च लागेल तितकें द्यावें; पण तिला कांहीं स्त्रीधन मिळालेलें असल्यास [ दुसऱ्या लग्नाच्या खर्चाचा ] कांहीं अंश मात्र द्यावा. १४८ वांटे झालेले नाहीत अशी तक्रार असेल तेव्हां वांटणी झाल्याबद्दलची शाबिती जातभाऊ, संबंधी, साक्षी, लेखपत्रे, आणि घरें किंवा शेतें निरनिराळ्या (विभक्त पुरुषांच्या) ताब्यांत असतील त्याबद्दलच्या [ पुराव्या ] वरून करावी. सीमेच्या तंट्याविषयीं. १४९ शेताचे हद्दीचे तक्रारींत सर्व शेजारी, मातारे, जाणते वगैरे गुराखी, शेजारचे शेत- करी आणि रानांत राहणारे १५० १५१ यानीं पुढें लिहिलेल्या खुणांवरून निर्णय करावा. जसें उंच जागा, कोळसे, धान्यांचा कोंडा, झाडें, पाण्याचे बंधारे, वारुळें, उतार, हाडें किंवा दगडाचे ढीग इत्यादि. सामंत (शेजारचे गांवचे लोक ), किंवा तंट्यांतील जमीन ज्या गांवचे हद्दीत अ- सेल त्या गांवांतील समसंख्याक [ ह्म० प्रत्येक गांवांतून ] चार, आठ, किंवा दहा, अ- सामींनीं तांबड्या फुलांच्या माळा घालून, तांबडी वस्त्रे नेसून, व थोडीशी माती [ डोक्या- वर ] घेऊन खरी सीमा असेल ती दाखवावी. १५२ त्यांनी खोटें सांगितल्यास त्यांस राजाने मध्यम प्रतीचे अपराधास जो दंड सांगि- तला आहे तो दंड करावा. परंतु सीमा ठाऊक असलेले मनुष्य नसतील किंवा वर सांगि- 'तलेल्या खुणांपैकीं खुणा नसतील तर, राजानें सीमा ठरवावी. १५३ बगीचा, माल सांठविण्याचें ठिकाण, गांव, पाणी पिण्याचें ठिकाण, सुखोपभोगाचा बगीचा, घर, पावसाचें पाणी जाण्यासाठी दोन घरांमधील पाण्याचें गटार, व अशासारख्या दुसऱ्या प्रकरणांत वर सांगितलेला नियम लागतो असें समजावें. १९४ जमिनीच्या सीमेच्या खुणा नाहींशा करून टाकण्याबद्दल, सीमेच्या बाहेरील जमी- न नांगरण्याबद्दल, व जमीन बळकावण्याबद्दल दंड [ अनुक्रमानें ] अगदी थोडा, अत्यंत भारी, व मध्यम प्रतीचा [ असे सांगितलेले आहेत ]. १५५ एकादें पाण्याचें धरण (बांध) बांधल्यामुळे [ शेताचे मालकास ] विशेष अडचण