पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ याज्ञवल्क्यस्मृति. पण संसृष्टी हे भिन्नोदर असल्यास मृतसंसृष्टीचें धन भिन्नोदर वारसदारांतून जो संसृष्ट असेल त्यानेंच ध्यावें ; असंसृष्ट भिन्नोदरास अधिकार नाहीं. [ परंतु भिन्नोदर संसृष्टीव सोदर असंसृष्टी असे वारस असतील तेव्हां ] एकट्या संसृष्ट भिन्नोदरानेंच घ्यावें असें नाहीं. तर असंसृष्ट सोदर व संसृष्ट भिन्नोदर यांनी समभाग वांटून घ्यावं. १३८-१३९ नपुंसक, पतित, व त्याची संतति, पांगळा, वेडा, वेडगळ, आंधळा व परीक्षा होत नाहीं अशा रोगाने पिडलेला, इत्यादि पुरुषांस, हिस्सा घेण्यास अधिकार नाहीं ; त्यांस अन्नवस्त्र दिलें पाहिजे. १४० [ पण वर सांगितलेले ] पुरुषांचे औरस. किंवा क्षेत्रज पुत्र जर निर्दोष असतील, तर ते हिस्सा घेण्यास लायक आहेत. [ वर सांगितलेले ] पुरुषांस मुली असल्यास त्यांची लग्ने होत पावेतों त्यांचें पोषण केलें पाहिजे. १४१ [वर सांगितलेले पुरुषांस] निपुत्रिक स्त्रिया असून त्यांची वर्तणूक चांगली असल्यास त्यांस अन्नवस्त्र द्यावें ; पण व्यभिचारिणी किंवा प्रतिकूल वागणाऱ्या असल्यास त्यांस घरांतून बाहेर काढून द्यावें. १४२ बापानें, आईनें, पतीनें किंवा भावाने एकाद्या स्त्रीस में दिलें असेल, किंवा विवाह कालचे होमाचे समयीं जें तिला मिळालेले असेल तें, व जें आधिवेदनिक ( ह्मणजे दुसरी बायको करतेवेळेस पहिले बायकोचे समजीसाठीं जें दिलें जातें तें) व असेंच दुसरें कांहीं रिक्थीतादि तिला मिळालेले असेल त्यास स्त्रीधन असें ह्यटलें आहे. १४३ [ नवऱ्या मुलीस ] तिचे बंधूंनी जे दिलें तें; शुल्क ( मुलीबद्दल आई बापांनी घेत- लेला पैसा ); अन्वाधेयक ( लग्नाचे नंतर नवऱ्याच्या सोयऱ्या संबंध्यांनी तिला दिलेलें असेल तें ); हीं, तिला कांहीं अपत्य झाल्यावांचून ती मरेल तर, तिच्या भर्त्रादिबांधवांनी घ्यावी. १४४ ब्राह्म विवाहादिक चार विधींपैकी कोणत्याही विधीनें विवाहित झालेल्या स्त्रीस कांहीं अपत्य न होतां ती मरेल तर तिचा नवरा स्त्रीधनाचा मालक होतो; पण बाकी राहिलेल्या [ चार विधींतून कोणत्याही विधीनें तिचें लग्न झालेलें असल्यास तिचें स्त्रीधन ] तिचे आईबापांनी घ्यावें. पण तिला कन्या असल्यास ती कन्या घेईल. कन्या नसल्यास कन्येची कन्या (अपत्य). ती आठी प्रकारच्या विवाहांत घेईल. १४५ जर कोणा पुरुषानें आपल्या कन्येचें वाग्दान करून नंतर ती परत घेतली, तर तो दंडास पात्र होय. त्याजकडून [ लग्नसंबंधी ] सर्व खर्च व्याजासुद्धां देववावा. वाग्दानानंतर कन्या मेल्यास नवऱ्याकडून जो विषय तिला मिळालेला असेल त्यांतून दोन्ही पक्षांस झालेला खर्च वजाकरून बाकी राहील ती पाहिजे तर नवऱ्यानें घ्यावी. १४६