पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यवहाराध्याय. ५.१. ( ४ ) ज्याचा बाप प्रसिद्ध नाहीं असा घरचे घरांत गुप्तपर्णे झालेला जो पुत्र त्यास 6 गूढज ' असें ह्यटलें आहे; ( ५ ) अविवाहित कन्येस झालेला जो पुत्र तो 'कानीन; हा कानीन पुत्र [ आईचे बापाचा ] पुत्र असे मानलेलें आहे... १२९ ( ६ ) स्त्रीस प्रथम विवाहसुखोपभोग झाल्यावर, किंवा पूर्वी स्त्रींचा दुसरा विवाह होऊन त्यापासून तीस झालेला पुत्र तो 'पौनर्भव ' ; ( ७ ) बापाने किंवा आईनें जो दुसऱ्यास दिला तो ' दत्तक ' होय. १३० (८) आईबापांनी विकलेला जो पुत्र तो 'क्रीत '; ( ९ ) आपण होऊन [पुरुषानें किंवा स्त्रीनें] पुत्राप्रमाणे जो पाळलेला किंवा मानलेला तो 'कृत्रिम पुत्र' (१०) आपण होऊनच जो [ आपणांस ] दुसऱ्यास देतो तो ' स्वयंदत्त; ' ( ११ ) लग्न होण्या- पूर्वी [ अन्यापासून ] गर्भात असलेला पुत्र तो 'सहोढज '; १३१ ( १२ ) आईबापांनी टाकिलेला पुत्र दुसऱ्यानें पुत्राप्रमाणें स्वीकारल्यास तो 'अप- विद्ध' पुत्र होय. हे पुत्र, पहिल्याचे अभावी दुसन्यास अशा अनुक्रमानें [ पितरांस पिंड देणारे ] व [ बापाच्या मालमत्तेचा ] हिस्सा घेणारे होतात. १३२ हा जो मी औरसादि १२ पुत्रांचा विधि सांगितला तो सजातीयविषयींच होय [ असें समजावें ]. शूद्र पुरुषानें दासीच्या ठायीं उत्पन्न केलेला पुत्रही [ पित्याचे ] इ- च्छेनें हिस्सा घेणारा होतो. • बापाचे मरणानंतर बंधूंनीं त्यास ( शूद्राचे दासीपुत्रास ) पुत्रांस जो प्रत्येकीं हिस्सा मिळेल त्याचे अर्धाबरोबर ) द्यावा.. जर भाऊ नसतील ( ह्मणजे त्या शूद्रास पुत्र नसतील ) आणि त्या नसेल तर, त्यानें बापाची सर्व जिनगी घ्यावी. १३३ अर्धा हिस्सा ( इतर शूद्राच्या दासीपुत्रास शूद्राचे कन्येस पुत्रः १३४ स्त्री, कन्या, आई, बाप, भाऊ, तसेच त्याचे पुत्र, गोत्रज पुरुष, बंधु व शिष्य, आणि सतीर्थ्य (एकाच गुरूचे शिष्य) हे, १३९. पुत्र नसतां जो स्वर्गस्थ झाला त्याचे जिनगीचे, पहिला नसल्यास दुसरा अशा अ- नुक्रमानें वारस होतात. हा नियम सर्व वर्णीस सारखाच लागतो.. १३६ वानप्रस्थ, यति, व ब्रह्मचारी यांचे जिनगीचे वारस झटले ह्मणजे भावाप्रमाणे मानलेला व एकाच धर्माचा [ असेल ] तो, सच्छिष्य, आणि आचार्य, हे अनुक्रमानें होतात. १३७ संसृष्टीचें ( एकदां विभक्त होऊन पुनः एकत्र झालेल्याचें ) धन [ त्याच्याशीं ] जो संसृष्ट झाला असेल त्यानें घ्यावें [ हा सामान्य नियम ]. [पण सोदर असोदर यासंबं- धानें नियम असा ]. सोदर संसृष्टी मृत झाल्यावर त्याला पुत्र होईल तर त्याचें धन त्या पुत्रास द्यावें; न झाल्यास त्याशीं संसृष्ट असलेल्या दुसन्या सोदर संसृष्टीनें तें घ्यावें ...