पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० याज्ञवल्क्यस्मृति. बापांपासून झालेले पुत्रांचे (चुलत भावांचे वगैरे) दरम्यान जे हिस्से मिळण्याचे ते त्यांचे बापांचे हिश्शांस जसा विभाग येईल त्याप्रमाणें. १२० जमीन, वर्षासनें वगैरे, किंवा सोनें, रुपें इत्यादि जिनगी ही आपल्या बापाच्या वरल्या कोणत्याही पुरुषासून प्राप्त झालेली असल्यास त्यांवर पुत्र व पिता या दोघांचीही मालकी सारखीच. १२१ [ पुत्र वगैरे विभक्त झाल्या ] नंतर सवर्ण स्त्रीपासून पुत्र होईल तर तोच पुत्र वि- भाग घेण्यास अधिकारी होतो; आणि पिता मृत झाल्यानंतर [ विभाग झाल्यावर ] तोटा नफा झाला असेल त्याचा हिशेब करून जी मालमत्ता दिसत असेल तींतून त्याला हिस्सा द्यावा. १२२ आईबापांनी जे द्रव्य [ पुत्रादिकांस ] बक्षीस दिलें असेल तें त्याचें एकट्याचेंच. बाप मेल्यानंतर जर पुत्रांनीं वांटणी केली, तर त्यांचे आईस त्यांचे प्रत्येकाचे विभागाएव- ढाच विभाग मिळाला पाहिजे. १२३ वांटणीच्या वेळेस ज्या भावांच्या मुंजी झालेल्या नाहींत त्यांचे मुंजी वगैरे संस्कार करण्यास खर्च लागेल तो समाइक करून शेष द्रव्याच्या वांटण्या कराव्या. ज्या बहिणीं- चीं लग्ने व्हावयाचीं आहेत, त्यांस प्रत्येकीस सर्व भावांनी आपआपल्या जातिक्रमानें पुढील श्लोकांत सांगिलेल्या हिश्शाचा चौथा हिस्सा द्यावा. १२४ [ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, आणि शूद्र जातींच्या स्त्रियांपासून झालेले ] ब्राह्मणाचे पुत्रांस अनुक्रमें चार भाग, तीन भाग, दोन भाग, आणि एक भाग मिळतात; [ क्षत्रिय, वैश्य, व शूद्र जातींचे स्त्रियांपासून झालेले ] क्षत्रियाचे पुत्रांस अनुक्रमें तीन, दोन, आणि एक भाग; आणि [ वैश्य व शूद्र जातींच्या स्त्रियांपासून झालेले ] वैश्याचे पुत्रांस अनुक्रमें दोन आणि एक विभाग. १२५ एका हिस्सेदाराने जर कांहीं द्रव्य आपल्या बरोबरचे हिस्सेदारांचे न कळत दडवून ठेवलें असून ते विभक्त झाल्यावर तें उमगलें तर सर्व हिस्सेदारां तें समभाग वांटून घ्यावे अशी शास्त्रराति आहे. १२६ निपुत्रिक पुरुषानें आज्ञा घेऊन अन्य पुरुषाचे स्त्रीचे ठायीं उत्पन्न केलेला पुत्र दोघांस ही ( ह्मणजे खऱ्या व नामधारी बापास) पिंड देण्यास अधिकारी व त्यांची मालमत्ता - ण्यास कायदेशीर वारस होईल. १२७ ( १ ) शास्त्रोक्तधर्माने लग्न झालेले स्त्रीचे ठायीं उत्पन्न केलेला पुत्र तो ' औरस ' पुत्र होय; ( २ ) त्याच्याशीं सम धर्मकन्येचा मुलगा; किंवा 'धर्मकन्या' ; (३) ' क्षेत्रज' ह्मणजे नवऱ्याच्या सगोत्रपुरुषापासून किंवा अन्यपुरुषापासून त्याचे स्त्रीला झालेला पुत्र ; १२८