पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यवहाराध्याय. ४९. उम्र देवांची पूजा करून नंतर ज्या पाण्यानें त्यांस स्नान घातलें तें पाणी आणावें, आणि “ तोय त्वं प्राणिनां प्राणः " ('हे जला, तूं सर्व प्राण्यांचा प्राण आहेस') हा मंत्र मु- ख्य न्यायाधीशानें दिव्य करणाऱ्यास ऐकवून त्याजकडून त्या पाण्यांतून तीन पसे पाणी पिववावें. ११२ [ ही शपथ घेतल्यापासून ] चौदा दिवसांचे आंत ज्याला अग्निजलादिकांपासून उपद्रव किंवा राजाचे कृतीनें घडलेली अशी एकादी भयंकर विपत्ति प्राप्त होणार नाहीं, तो निःसंशय निर्दोष होय. दायविभागप्रकरण. • ११३ बापानें [ जिनगीची ] वांटणी केली तर त्यानें, आपल्या इच्छेप्रमाणे: सर्वांत वडील पुत्रास उत्तम भाग देऊन, किंवा सर्वास सारखे विभाग देऊन पुत्रांस [ आपणापासून ] विभक्त करावे. ११४ पूर्वोक्त कोणत्याही विभागांत स्वतःच्या बायकांस त्याजकडून किंवा त्यांच्या बा- पांकडून स्त्रीधन मिळालेले नसल्यास, त्यानें आपल्या बायकांसही पुत्रांच्या बरोबरीनें भाग दिले पाहिजेत. ११५ जो [ द्रव्य संपादन करण्यास ] समर्थ व ज्याची इच्छा [ हिस्सा ] घेण्याची नसेल अशास थोडेंसें देऊन विभक्त करावें. पुत्रांस कमीज्यास्ती विभाग देऊन बापानें केलेला विभाग जर सशास्त्र आहे तर तो योग्यच आहे, असें सांगितलें आहे. [ अशास्त्र झाला तर अयोग्य. ] ११६ आईबापांचे मरणानंतर त्यांचें द्रव्य व कर्ज पुत्रांनीं सारखे वांटून घ्यावें. आईच्या द्रव्यांतून तिचें देणें असेल तें देऊन जें उरेल तें मुलींनीं विभागून घ्यावें; मुलींच्या अभावीं त्यांची मुळे त्यांचे वारस होतात. ११७ वडिलार्जित जिनगीचें कांहीं नुकसान न होतां व तीहून भिन्न असें जे स्वतः मि- ळविलेलें असेल तें, जें स्नेह्यानें देणगीदाखल दिलेलें, व लग्नाचे प्रसंगी देणगी ह्मणून मि- ळालेलें तें, यांवर हिस्सेदारांचा हक्क नाहीं. ११८ [ त्याचप्रमाणे ] वडिलार्जित मालमिळकत गेलेली असून ती जर पुनः मिळविली, तर मिळविणारानें तिचा हिस्सा इतर हिस्सेदारांस देण्याची जरूर नाहीं. तसेंच स्वतःचे विद्वत्तेवर जें [ द्रव्य ] मिळविलेलें असेल त्याचा हिस्सा इतर हिस्सेदारांस देण्याची जरूर नाहीं. ११९ समाईक मिळकत वाढल्यास सम भाग ध्यावे, असें सांगितलें आहे. आपापल्या