पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ याज्ञवल्क्यस्मृति. देवांनी उत्पन्न केलेले असून तूं सत्याचें घर आहेस. यंत्रा, सत्य बोल. मला अपवादापासून मुक्त कर. ह्मणून, हे मंगलदायक तुला- १०१ हे माते, मी जर पापकर्म केलें असेल, तर मला खालीं ने; जर मी निष्पाप असेन तर मला वर ने. " १०२ ज्या मनुष्यानें दिव्य करण्याचे कबूल केलें त्यानें आपले हात भाताच्या दाण्यांनी चोळल्यावर त्याचे हातांवर खुणा कराव्या ; आणि अश्वत्थ वृक्षाचीं सात पानें ठेवावीं ; व अश्वत्थाचे पानांचे संख्येइतके ( ह्मणजे सात ) फेरे देऊन सुतानें हात बांधावे. १०३ “ हे शुद्धि करणाऱ्या अग्नि, तूं सर्व भूतांचे अंतभीग व्यापणारा आहेस; तर मा- झ्यामध्यें पाप आहे किंवा पुण्य आहे हें माहीतगार साक्षीप्रमाणे सत्य सांग". १०४ याप्रमाणे दिव्य करणाराने झटल्यानंतर पन्नास पलें ( नांवाचे) वजनाचा तापून जळजळीत झालेले लोखंडाचा गुळगुळीत गोळा त्याचे दोन्ही हातांत द्यावा. १०५ असा लोखंडाचा गोळा हातीं घेऊन [ मंडलाच्या रेषे ] बाहेर न ढळतां हळू हळू सात मंडळें चालावें. सोळा आंगळें व्यासाचे चक्रास मंडळ समजावें. प्रत्येक मंडळामध्यें तितकेंच (सोळा आंगळें ) अंतर असावे. १०६ त्यानें हातांतील लोखंड टाकून दिल्यावर व भाताच्या दाण्यांनी [हात ] चोळ- ल्यावर जर त्याचे हात भाजलेले न दिसतील तर त्यास दोषमुक्त करावें. [ तो मंडलावरून चालत असतांना ] त्याचे हातांतून लोखंडाचा गोळा खालीं पडल्यास, किंवा कांहीं संशय उत्पन्न झाल्यास त्यानें तो गोळा पुनः घेऊन चालावे. १०७ “ सत्येन माभिरक्ष त्वं वरुण " ( सत्यरक्षणार्थ, हे वरुणा, माझें रक्षण कर ) या मंत्राने उदकाचें अभिमंत्रण केल्यावर दिव्य करणान्याने नाभीपावेतों पाण्यांत उभा राहि- लेल्या पुरुषाच्या मांड्या धरून, पाण्यांत बुडावें. १०८ [ आरोपी ] पाण्यांत बुडतांना [ त्या ठिकाणाहून ] सोडलेला बाण [ जेथें पडेल तेथून ] उत्तम धांवणाऱ्या पुरुषानें आणून दुसऱ्या धांवणाऱ्यानें तो पुनः त्या ठिकाणीं ने- ईपावेतों जर आरोपी पाण्यांत बुडलेलाच राहील, तर तो आरोपी निरपराधी समजला जाईल. १०९ " हे विषा, तूं ब्रह्मयाचा पुत्र आहेस ; सत्याची निवड करण्यासाठीं तुला नेमलेले आहे. ह्या आरोपापासून मला राख. जर माझा पक्ष खरा असल तर तूं मला अमृताप्र- माणें हो. " ११० असें ह्मटल्यानंतर हिमालय पर्वतांत उत्पन्न होणारे शार्ङ्गनामक विष [ आरोपीनें] प्यावें. त्याला असें विष [ आंगांत ] कांपरें भरल्यावांचून जर जिरेल, तर तो निर्दोष ठरवावा. १११