पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यवहाराध्याय. ४७ कर्ज परत दिल्यानंतर लेख ( ह्मणजे. रोखा वगैरे) फाडून टाकवात्रा; किंवा कर्ज अरत दिल्याबद्दल निराळा लेख करावा. ज्या कर्जाचे [ मजबुतीसाठीं ] साक्षी असतील कर्ज साक्षींचे समक्ष परत द्यावे. दिव्यप्रकरण. ९४ [ अपवादापासून ] मुक्तता होण्यासाठीं हीं दिव्यें आहेत: तुळा, अग्नि, पाणी, विष, आणि कोश (देवांचे तीर्थ घेणें ), ज्यांत मोठा तंटा असेल अशा प्रकरणांत आणि [ सुटका किंवा दंड, यांपैकी दिव्याचा निकाल होईल त्याप्रमाणे, ] आपण सोसण्यास सिद्ध आहों असें वादीनें कबूल केलें असेल तर त्या ठिकाणी, दिव्ये करण्याची ९५ अथवा, उभयपक्षांस मान्य असेल तर, वादोनें दिव्य करावें; फ्ण [ जर वादीचा पक्ष खरा आहे असें सिद्धं होईल तर ] प्रतिवादीनें दंडास ( शिक्षेस) कबूल झालें पाहिजे. राजद्रोह किंवा [ प्रथम प्रतीचें ] पातक या प्रकरणांत पक्षकारास दिव्य करण्याची मोकळीक द्यावी, मग विरुद्ध पक्षकार [ त्यांचा पक्ष खोटा ठरल्यास ] दंडास कबूल नसला तरी हरकत नाहीं. ९६ [ दिव्य करण्यास जो पक्षकार सिद्ध असेल ] त्यास बोलाविल्यावर [ व तो आल्यावर ] त्याजकडून पूर्वदिवशीं उपोषण करवून व सचैल स्नान करवून राजा आणि ब्राह्मण यांचे समक्ष जें कोणतें दिव्य कर्तव्य असेल तें मुख्य न्यायाधीशानें त्या पक्षकाराकडून सूर्योदयों करवावें. ९७ स्त्रिया, मुर्ले, वृद्ध, आंधळे, पांगळे, ब्राह्मण आणि रोगी यांनी दिव्य कर्तव्य अ- सल्यास तुळादिव्य करवावें. [ क्षत्रिय आणि वैश्य यांजकडून दिव्य करविणें असेल तेव्हां] अग्निदिव्य आणि जलदिव्य यथानुक्रमानें करवावें. शूद्रास दिव्य कर्तव्य असेल तेव्हां सात यवभार विषाचा प्रयोग करून विषदिव्य करवावें. ९८ नांगराचे योगानें दिव्य, विषप्रयोगाचें दिव्य, आणि तुळादिव्य यांतून कोणतें ही दिव्य जर वादांतील रकमेचा आकार हजार पणांपेक्षां कमी असेल तर करू देऊं नये. राजाविरुद्ध कोणताही अपराध असला तरी त्यांत, व प्रथम प्रतीचे ह्मणजे महापात- काचे संबंधानें [ वादी किंवा प्रतिवादी ] पक्षकारानें [ आपलें मन आणि शरीर ] शुद्ध करून दिव्य करावें. ९९ तुला करण्याचे कामांत प्रवीण अशा पुरुषांनीं प्रतिवादीस तराजूचे पारड्यांत बसवून त्याचे भारंभार [ कांहीं पदार्थ ] वजन करून घेतल्यावर व त्याबद्दल खुणेची रेषा काढल्यावर व त्यास पारड्यांतून खाली उतरविल्यावर, १०० न्यानें (प्रतिवादीनें) तराजूस उद्देशून प्रार्थीवेंः- " हे तुलायंत्रा, तुला प्राचीन काळीं