पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ याज्ञवल्क्यस्मृति. लेख -- · उभयपक्षांचे राजीखुषीनें जो सुवर्णादि द्रव्याविषयीं करार केला जातो [ त्याबद्दल लेख करावा, व त्यावर आरंभी धनकोचें नांव असून त्यावर साक्षी असावे ; ८४ [शिवाय त्या लेखावर ] वर्ष, महिना, पक्ष, तिथि, आणि ऋणकोधनकोंचीं नांवें जाति, गोत्र, व शाखा, व धनको व ऋणको यांच्या बापांची नांवें वगैरे असावीं. ८५. करारांतील सर्व ठराव [ त्या लेखांत ] लिहिल्यावर त्याखाली ऋणकोनें स्वहस्तानें सही करावी, [आणि] " मी अमक्याचा पुत्र, माझें संमत वर लिहिलेले करारास आहे, " असे लिहावं. ८६ आपल्या नांवाचे पूर्वी आपल्या बापाचे नांवें लिहून साक्षीनी सह्या कराव्या. त्या अशा:- " मी अमक्याचा पुत्र, अमुक ह्यास साक्षी आहे." ह्या साक्षींची संख्या संख्येनें क गुणांनीं सम असावी. ज्या मनुष्याने तो करार लिहिला असेल त्यानें त्या कराराचे शेवटीं " मी अम- क्याचा पुत्र, अमुक नांवाचा, म्यां उभयपक्षांचे विनंतीवरून हा करार लिहिला असे " याप्रमाणे लिहावें. ८८ स्वहस्ताचे लेखावर जरी साक्षी नसले, तरी तो लेख [ ज्या पुरुषाचे हातचा असेल: त्याचे विरुद्ध ] पुरावा. होय असे ह्यटलेले आहे; मात्र तो लेख कपटानें किंवा जबरीनें. करून घेतलेला नसावा. ८९. ज्या कर्जाबद्दल रोखा असेल तें कर्ज तीन पिढ्यांपावेत मात्र लागू आहे... कर्जा- बद्दल तारण दिलेलें असेल तर त्याचा उपभोग कर्जाची फेड होईपावेतों करण्याचा हक्क आहे. ९० [ दिलेला ] लेख जर देशांतरीं असेल, जर त्याचा बोध होत नसेल, जर तो हरवला असेल, किंवा त्यावरील अक्षरें उडाली असतील, किंवा चोरीस गेला असेल; तसेच जर तो फाटला, जळाला, किंवा त्याचे तुकडे झाले असतील, तर [ राजानें ] दुसरा लेख: करवावा. ९१ लेख न दिल्याची तक्रार पडेल किंवा कांहीं संशय उत्पन्न होईल, तर त्या लेखाचे' खरेपणाची शाबिती [ ज्या मनुष्यानें तो लिहिला होता ] त्याचे हातचे इतर लेखांशी वगैरे तुलना करून करून घ्यावी ; [ तसेंच ] अनुमानावरून पक्षकारांचे समक्ष रुजुवाती- वरून किंवा दुसऱ्या एखाद्या प्रत्यक्षप्रमाणावरून, चिन्हें किंवा खुणा यांवरून, पूर्वीचे संबं धावरून व हक्काचे संभवावरून करावा. ९२ [ निरनिराळे वेळीं ] ऋणकोनें [ परत ] दिलेल्या रकमा लेखाचे पाठीमागे ऋण- कोनें लिहिल्या पाहिजेत; अथवा धनकोनें स्वदस्तुरच्या पावत्या दिल्या पाहिजेत. ९३.