पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यवहाराध्याय. ४५ एकाच पुरुषाची साक्ष [ बस ] आहे. जारकर्म, चोरी, मारामारी आणि साहस ( मोठ्या अपराधांचे ) मुकदम्यांत पूर्वोक्त निषिद्धही साक्षी चालेल. ७२ पातकी व महापातकी पुरुष कोणत्या लोकास जातात ही गोष्ट, वादी व प्रतिवादी यांचे समक्ष, साक्षीदारांस सांगावी. ७३ [ लोकांची ] घरे जाळणारे व स्त्रीहत्या आणि बालहत्या करणारे पुरुष ज्या नर- कादि लोकांस पचतात त्या लोकांस जो खोटी साक्ष देईल तो [ मरणानंतर ] जाईल. ७४ तूं शेंकडों जन्मीं केलेली सर्व पुण्यें खोटी साक्ष देऊन ज्याचा पक्ष हरविशील त्यास प्राप्त होतील हें तूं समज. जो मनुष्य [ हजर असून वगैरे ]- ७५ जवानी देणार नाहीं त्याजकडून राजानें ४६ सावे दिवशीं दाव्याची सर्व रक्कम देव- वून एक दशांश दंड घ्यावा. ७६ दाव्यांतील गोष्टीची माहिती असून जो पुरुष साक्ष देणार नाहीं तो नराधम खोटी साक्ष देणाऱ्याप्रमाणेच पापी व शिक्षेस पात्र समजावा. ७७ [ साक्षींचे ] पुराव्यांत विरोध असल्यास ज्यास्ती साक्षींची संख्या जिकडे तें सबळ; एकमेकांविरुद्ध बोलणारे साक्षींची संख्या सारखीच असल्यास जिकडे गुणी पुरुषांची साक्ष तें सबळ; दोन्ही पक्षांकडे सारखेच गुणी पुरुष असल्यास त्यांत जे अधिक गुणसंपन्न त्यांची साक्ष ग्राह्य होय. ७८ ज्या पक्षकाराची जी तक्रार असेल तिच्या सत्यतेबद्दल त्याचे साक्षीदारांनी साक्ष दिल्यास त्याचा पक्ष जिंकेल. पक्षकाराचे दाव्यांतील तक्रारीचे विरुद्ध त्याचे साक्षीदार साक्ष देतील तर त्याचा पक्ष हरलाच पाहिजे. ७९ साक्षीचा पुरावा घेतल्यावरही जर विशेष विश्वासास योग्य असे साक्षी, किंवा पहि- ल्याने जितके साक्षी झाले त्यांचे दुप्पट साक्षी, पहिल्या साक्षींचे विरुद्ध पुरावा देतील, तर पहिले साक्षी खोटे पडतात [असें समजावें. ] ८० [ लांच वगैरे देऊन ] खोटी साक्ष देवविणारास, तसेंच खोटी साक्ष देणारास, प्रत्येकीं, दाव्यांतील हरलेल्या पक्षकारास जेथें जो दंड सांगितला आहे त्या रकमेचे दुप्पट दंड करा- वा. ब्राह्मणानें [असें कर्म केल्यास ] त्यास हद्दीपार करावें असें सांगितलेलें आहे. ८१ साक्ष देण्यास बोलाविलेलें असून उन्मत्तपणानें जो साक्षीपुरावा छपवितो त्यास दाव्यांत हरलेल्या पक्षकारास जेथें जो दंड सांगितला आहे त्या रकमेचे आठपट दंड तो ब्राह्मण असल्यास त्यास हद्दपार करावें. करावा. ८२ [ खरें बोललें असतां ] चार वर्णांतील कोणी पुरुषास देहांत शिक्षा होण्याचा जेथें संभव असेल अशा ठिकाणीं साक्षीनें सत्य बोलूं नये. [ अशा असत्य बोलण्यापासून घड- लें ] पाप दूर करण्यासाठीं द्विजांकडून सरस्वती देवीस चरु होम करवावा. ८३