पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ याज्ञवल्क्यस्मृति. ठेव. ठेव काय आहे हैं सांगितल्यावांचून पेटीत वगैरे घालून बंद करून में द्रव्य एक मनुष्य दुसऱ्याच्या स्वाधीन करतो ती मोहरबंद ठेव होय. [ ती ठेव जशी होती ] तशीच परत दिली पाहिजे. ६५ राजाच्या किंवा ईश्वरी कृत्यानें अथवा चोरांच्या कृतीनें जें ( ठेवीचें द्रव्य) नाहींसें होईल तें [ धन्यास ] भरून देवविलें जाणार नाहीं. ठेव परत देण्याबद्दल मागणी केली असून ठेव परत न दिली, आणि त्यानंतर तें द्रव्य [ नाहींसें होईल तर ] ठेव ठेवणा- राचें झालेले नुकसान ठेव ठेवून घेणाराकडून भरून देववावें; शिवाय ठेवीचे रकमेइतका दंड त्याजकडून घ्यावा. ६६ ठेवलेले ठेवीचा अधिकारावांचून उपभोग करील किंवा त्यावर पैसा मिळवील त्यास शिक्षा झाली पाहिजे व त्याजकडून ठेवीची रक्कम सव्याज परत देवविली पाहिजे. उसन्या घेतलेल्या वस्तु किंवा [धन्यास परत देण्यासाठी उसन्या घेणाराने तिन्हाइताच्या ] स्वाधीन केलेल्या वस्तु अथवा [ मालकास न कळत त्याचे चाकराचे ] स्वाधीन केलेल्या वस्तु किंवा [ खुद्द मालकाच्याच ] स्वाधीन केलेल्या वस्तु किंवा सोनार वगैरे यांजकडे दिलेली सुव- र्णादि वस्तु यांविषयीं हाच नियम लागू समजावा. साक्षी. ६७ पस्तवी पुरुष, दानधर्म करणारे, कुलीन, खरें बोलणारे, स्वधर्माने चालणारे, सरळ स्वभाचे, पुत्रवंत, व धनवान [ हे योग्य साक्षी होत ]. ६८ मात्र अशा साक्षींची संख्या तिहींहून कमी नसावी व वेदोक्त व स्मृत्युक्त क्रियेंत तत्पर, त्याच जातीचे व त्याच वर्णाचे असे असावे; [ पण असे न मिळाल्यास ] कोणत्याही जातीचे किंवा वर्णाचे साक्षी कोणत्याही जातीसाठी किंवा वर्णासाठी घ्यावे असें सांगितलेले आहे. ६९ स्त्री, अज्ञान मूल, वृद्ध माणूस, जुगारी, झिंगलेला मनुष्य, भूतपिशाचादिकांची बाधा झालेला, ब्रह्महत्यादि पापयुक्त पुरुष, रंगभूमीवर नाटक करणारा, नास्तिक, खोटे कागद करणारा, शारीर वैकल्य असलेला, ७० जातीतून बाहेर टाकलेला, स्नेही, दाव्यांतील प्रकरणांतील अर्थसंबंधी, भागीदार, शत्रु, चोर, साहसकर्मी पुरुष, लबाड ह्मणून प्रसिद्ध असलेला,, बंधुजनांनी सोडलेला, इत्यादिक पुरुष साक्षीस अयोग्य होत. ७१ उभयपक्षकारांचे संमत असल्यास श्रुति आणि स्मृति यांतील सर्व धर्म जाणणाऱ्या