पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यवहाराध्याय. जामिनाकडून धनकोचें कर्ज राजरोस रीतीनें देवविल्यास जामिनाने दिलेले रकमेचे दुप्पट त्यास ( जामिनास ) ऋणकोकडून देववावी. ५६. पशु जातीचे मादीचे संबंधाने तिची प्रजा; धान्य तिप्पट; वस्त्रे चौपट; व प्रवाही पदार्थ पट [ या प्रमाणानें मूळ कर्जदाराबद्दल ज्याने रक्कम भरली असेल अशा जामि- नास द्यावी.. ] ५७ कर्जाबद्दल दिलेलें गहाण, कर्जाची दुप्पट [ व्याजाचे संबंधानें ] होईपावेतों सो- डवून परत न घेतल्यास, सावकाराकडे डुलतें. गहाण सोडवून घेण्याची मुदत ठरविलेली असल्यास मुदत भरतांच तें डुलते; परंतु, [ दरम्यानचें ] उत्पन्न घेऊन तारण राखावें अशा कराराचे असल्यास दिलेलें गहाण कधींही डुलत नाहीं. १८ तारण ह्मणून नुसतें ठेवण्यासाठी दिलेले गहाणाचा उपभोग केल्यास, किंवा उप- भोग करण्यासाठीं दिलेलें असून त्याची खराबी केल्यास [ मुदलावर ] व्याज मिळावयाचे नाहीं. अग्निजला द्युपद्रवकृत व राजकृत शिवायकरून इतर कोणतेही संबंधानें गहाण मालाची खराबी झाल्यास किंवा त्याचा नाश झाल्यास धनकोनें तें भरून दिलें पाहिजे. १९. गहाणाचा करार पुरा होण्यासाठीं दिलेले गहाणाचा स्वीकार झाला पाहिजे. दिलेलें महाण योग्य उपायांनीं रक्षिलेले असून त्याचा नाश झाल्यास त्याचे मोबदला [ ऋण- कोनें ] दुसरें गहाण दिलें पाहिजे; किंवा धनकोस त्याचें. कर्ज परत मिळाले पाहिजे. ६० [ स्नेहभावानें कमज्यास्त तारण ठेवून ] काढलेलें कर्ज ऋणकोकडून व्य देववावें; आणि जंगम वस्तु विसारादाखल स्वाधीन करून काढलेले कर्ज दुप्पट देव- कावे... ६.१. कर्ज परत देण्यास तयार होऊन ऋणको आपलें गहाण परत मागेल तर त्यास [ कर्ज परत घेऊन ] गहाण परत दिलेच पाहिजे; न दिल्यास तो चोराचे शिक्षेला पात्र होईल. धनकोचे अभावी धनकोच्या भाईबंदांस कर्जाची रक्कम परत देऊन ऋणकोनें गहाण. परत घ्यावे.. ६२: अथवा त्या वेळेच्या बाजारभावानें किंमत ठरवून पाहिजे तर त्यानें धनकोज-- वळ, व्याजावांचून, गहाण राहू द्यावें; पण [ दुसऱ्या पक्षीं ] ऋणको जवळ नसल्यास साक्षीचे समक्ष गहाण बाजारांत पाहिजे तर [ धनकोनें ], विकावें .. ६३: जेव्हां तारणावर दिलेले कर्ज व्याजाचे कारणानें दामदुप्पट होईल, तेव्हां तारणाचे उत्पन्नांतून कर्जाचे दुप्पट रक्कम वसूल करून घेतल्यावर तारण परत दिलें पाहिजे. ६४: