पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० २ विवाहाविषयीं. २९ . ( २७.) पुरुषाच्या विवाहकालास सांप्रत नियम नाहीं. • पूर्वी २४ पासून ३० वर्षेपर्यंत मानीत असत." उपनयनाचे उत्तम काल, ब्राह्मणास ८, क्षत्रियास ११, व वैश्यास १२ वर्षे; व गौण काल, १६,१२ व २४, वर्षेपर्यंत अ सांगितलेलें आहे.” त्या- नंतर वेदाभ्यास करून, गुरूस दक्षिणा देऊन, मग सोडमुंज करून, लक्षणयुक्त स्त्रीशीं विवाह करावी. दक्षिणा कलियुगांत निषिद्ध आहे. १४ कन्या कशी असावी याविषयी सांगितलेले आहे:---- याज्ञवल्क्य, आचारा- ध्याय, श्लोक ५२: – “अनंन्यपूर्वकां कान्तामसपिण्डां यवीयसीम् । अरोगिणीं भ्रातृ- मतीमसमानार्षगोत्रजाम्” ॥ अर्थः - दानानें अथवा उपभोगानें जी दुसऱ्या पुरुषाने स्वीकृत नव्हे, आणि तिच्याशी विवाह करणारा 'जो पुरुष, त्याच्या मनास व नेत्रांस आनंद दे- णारी, व' असपिण्ड ह्मणजे शास्त्रांत सांगितलेल्या सापिण्ड्यानें रंहित, आणि वरापेक्षां वयानें व शरीरप्रमाणानें न्यून, व जो रोग औषधोपचारांनी जाणारा नव्हे अशा रोगानें रहित, आणि जिला बंधु आहे अशी, वराच्या गोत्राहून भिन्न गोत्र आणि भिन्नं प्रवर यांत झालेली, अशा कन्येशी विवाह करावा. १६ (२८) आतां दुसन्या पुरुषानें स्वीकृत, व एकगोत्रा, सप्रवरा, व सपिण्डा, अशी असल्यास तिशीं विवाह करूंच नये. बाकीचे दोष जरी आहेत, . तरी त्यांवरून विवाहास अटकाव होत नाहीं. तसाच विरुद्ध संबंध करूं नये;" ह्मणजे, मेहुणीची मुलगी, सापत्न आईची बहीण, व तिची कन्या, चुलतीची बहीण व तिची कन्या, यांशी लग्न करूं नये, असें ह्मटलेले आहे; परंतु हें लोकविरुद्ध दिसेल ह्मणून असे सांगितलेले आहे असें वाटतें. सप्रवर कन्येशीं न समजता विवाह झाला असतां, प्रायश्चित्त करून पुनः त्याच वराशीं विवाह करावा असे सांगितलेले आहे." सगोत्र व सपिण्ड कन्येशी विवाह झाला, तर तिजमध्यें भार्यात्व येत नाहीं; ह्मणून विवाहानंतर आईप्रमाणे तिचा प्रतिपाल करावा, असे कित्येक ग्रंथकार ह्मणतात. परंतु त्यांच्या मतास अनुसरून जर ती मुळींच कोणाची भार्या झाली नाहीं असें मानिलें तर तिचा योग्य वराशीं विवाह करण्यास बाघ कोणता हें समजत नाहीं. विचार करून पाहतां, सांप्रतचा आचार अन्या- याचा व पक्षपाती दिसतो. वरील मतें हीं ग्रंथानुसार सांगितलीं सांप्रत लोकाचारांत ११. मनुस्मृति, अ० ९, श्लोक ९४. १२. आश्वलायन गृह्यसूत्र, अ० १, खण्ड १९ वें. १३. याज्ञवल्क्यस्मृति, अ० १, श्लोक ५१. १४. निर्णयसिंधु, परिच्छेद ३रा, कलिवर्ज्य प्रकरण. १५. संस्कारकौस्तुभ, विवाहप्रकरण, प. १९७, पृ० १ लें, प्रप्त शके १७८३ त छापलेली. १६. सापिंडयप्रदीप ग्रंथीं सापिंडय प्रकरण पहा. १७. पाणिग्रहणचंद्रिका, विश्वादर्श, आणि निर्णयसिंधु टीका पहा.