पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० नाहींत. परंतु वर्णातिक्रॅम झाला नसून फक्त पोटजातीबाहेर विवाह झाला असेल तर तो अशास्त्र ह्मणतां येणार नांहीं असे दिसतें. मुंबईपासून थोड्या अंतरावर अष्टांगर ' ह्मणून कोंकणाचा एक लहान भाग आहे त्यांत ब्राह्मण ज्ञातींतील फोटभेद न मानितां सरमिसळ विवाह करतात. तथापि त्यांचे विवाह कायदेशीर मानले जात आहेत. घां- टावर कऱ्हाडे व देशस्थ यांमध्ये परस्परांत विवाह विनहरकत होतात. एकानें कांहीं मुली होत्या त्यापेक्षां वरच्या जातींच्या आहेत असा वरच्या जातींच्या पुरुषांचा समज करवून त्यांकडून त्यांच्याशी विवाह लावविला. - हायकोटीनें असें ठरविलें कीं, असा विवाह प्रशस्न नव्हे, तरी अशास्त्र व गैर कायदा होत नाहीं ह्मणून आरोपीवर फस- विल्याचा अपराध लागू होत नाहीं. ( बादशाहीण वि० श्रीलाल. इं० ला० रि० 'अला० व्हा० २ पा० ६९४ . ) मद्रास इलाख्यांत शूद्र लोकांत अनौरस स्त्रीशी किंवा नवन्याशीं औरस शूद्रांच्या जाति भिन्न असतांही विवाह चालतो. ( इंदरं वळंगी पुली तलवर वि० रामस्वामी पांड्या तलवर मू० इं० अ० व्हा० १३ पा० १४१; बं० ला० रि० व्हा० ३ प्रिव्ही कौन्सिल पा० १६. बी० रि० व्हा १२ प्रिव्ही कौन्सिल पा० ४१. ( ह्याच कज्जांतील हायकोर्टाचा ठराव म० हा० रि० व्हा० १ पा० ४७८ येथे पहा.) शूद्रांत मलवर जातीच्या जमीनदारांचा वेल्लाळ जातीच्या स्त्रीशी विवाह चालतो. ( (र- ममणी अम्मल वि० कुळांथी नाचिअर मुं० इं० अ० व्हा० १४ पा० ३४६; वी० रि० व्हा० १७ पा० १.) ० लग्न न (२६.) कन्येचा विवाहकाल आठांपासून बारा वर्षेपर्यंत मानिलेला आहे." पुढे अविवाहित ठेविल्यास कांहीं अदृष्ट दोष मानितात. परंतु सांप्रत बारा वर्षांनंतरही मुलीचा विवाह होतो; व पूर्वी प्राप्तयौवन स्त्रियांनी तीन वर्षे वाट पाहून पित्य केल्यास, स्वयंवर करावा, असें ह्मटलेले आहे. ' यावरून सर्वत्रच सारखा पाठ होता असे दिसत नाहीं. तसेच जे प्राप्तयौवनकन्येच्या विवाहास दोष सांगितले, ते अदृष्ट आहेत; ह्मणून व्यवहाररीत्या तो विवाह रद्द होईल असे वाटत नाहीं. १० ८. पांडया तलावर वि० पुली तलवर ( म० हा० रि० व्हा० १ पा० ४७८ पहा.) यांत शूद्रज्ञार्ती- तीळ पोटभेदांमध्ये झालेला विवाह सशास्त्र आहे असे ठरविलेले आहे. त्याच कामांत प्रिव्ही कौन्सिलास अपील झाले होते. त्यांत हायकोर्टाचा ठराव कायम झाला (मू० इं० अ० व्हा० १३ पा० १४१ पहा०). याच प्रकारचा ठराव राममनी अम्मल वि० कुळांथाई नाचिअर या कज्यांत झाला आहे (मू० ई० अ० व्हा० १४ पा० ३४६ ) नारायण धारा वि० रखलगैना ( इं० ला० रि० १ क० १) ह्यांत रि- बाज नसेल तर पोटजातीत विवाह होणार नाहीं असें ठरलेलें होतें. उपमा कुचैन वि० भोकाराम दुबै इं० ला० रि० १५ क० ७०८. ९. मदनपारिजात, विवाहप्रकरण, संवर्त व कश्यप यांची वचनें पहा. तसेच मुहूर्तमार्तड, विवा- इप्रकरणांतहि अर्सेच सांगितलेले आहे. १०. मनुस्मृति, अ० ९, श्लोक ८८-९३.