पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ याज्ञवल्क्यस्मृति. मद्य, रंडीबाजी, किंवा द्यूतकर्म यांसाठी बापानें आपल्या जातीवर काढलेले कर्ज, दंडाचा हिस्सा देणें राहिलेला असल्यास तो, जकात, (दस्तुरी) बद्दलचें बाकी देणें राहि- ली असेल ती, किंवा कोणास व्यर्थ देणे कबूल केलेले असेल तें [हीं बापाचीं देणीं ] पुत्रानें देऊं नयेत. ४७ गौळी, मध्य विकणारे लोक, नाचणारे लोक, धोत्री व पारधी या लोकांत बायकोनें केलेलें कर्ज नवऱ्यानें द्यावें; कारण [ या जातीचे लोकांत ] नवन्याच्या चरितार्थास बायकोचीही मदत असते. ४८ जें पतिकृत कर्ज स्त्रीनें कबूल केलें असेल तें अथवा नवरा आणि तिनें असें उभ- यतांनी केलेलें अथवा तिनें एकटीनेच केलेलें हें स्त्रीनें द्यावें. दुसरे कोणतेंही कर्ज तिनें देऊ नये. ४९ बाप देशांतरी गेलेला असतां, किंवा मेल्यावर किंवा तो मोठया संकटांत मग्न अ- सतां त्याचें देणें जेथें तक्रार पडेल तेथें पुराव्यामें शाबीत होईल तर, पुत्रानें, पौत्राने द्यावें. ५० मृताची मालमत्ता ज्यानें घेतली त्याजकडून किंवा [ मृताची बायको घेणाराकडून ] मृत माणसाचें कर्ज देववावें. दोन्ही नसल्यास अनन्याश्रितद्रव्याने ( ज्या पुत्रानें बा- पाचा वारसा घेतलेला नाहीं त्यानें ) द्यावे. ज्या मृत मनुष्यास पुत्र पौत्र नसतील त्याचे कर्ज त्याचा वारसा घेण्यास जे अधिकारी असतील त्यांजकडून देववावें. ५१ विभक्त झाले नाहींत तोंपावेतों भावभावांत, नवराबायकोमध्यें व पिता आणि पुत्र यांचे दरम्यान, आपसांत जामीनकी, देवघेव, व एकमेकांबदल साक्ष देणें हे संबंध होऊं शकत नाहींत असें ह्यटलें आहे. ५२ [ कोणास वेळेस ] हजर करण्यासाठी, विश्वास पटण्यासाठीं, किंवा फेड करण्या- साठीं जामीनगत दिली जाते. पहिल्या दोन बाबदींत जामीनकी पुरी न केल्यास स्वतः जामीनच जबाबदार धरला जावा, पण तिसऱ्या बाबदीचे संबंधानें जामिनाचे पुत्रही जबा- बदार आहेत.. ५३ एकाद्यास हजर करण्यासाठी किंवा खरेपणाबदल कोणी जामीन राहिला असून तो यास मृताचे पुत्र बापाचे [ जामिनगतीचे ] जबाबदार नाहींत, परंतु कर्जाचे फेडीचे जामीनगतीचे बाबदींत पुत्रांनी कर्ज दिले पाहिजे. ५४ एकाहून ज्यास्ती जामीन असल्यास कर्ज देणें तें हिस्सेरशीनें सर्वांनीं द्यावें. परंतु प्र- त्येक जर अलाहिदा अलाहिदा जामीन झालेला असेल, तर धनकोचे इच्छेप्रमाणें त्यांतून कोणी तरी कर्ज फेडावें.