पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याज्ञवल्क्यस्मृति. ल्या योग्य मार्गावर आणावे. गवाक्षांतून सूर्याचे किरण पडले असतां त्या किरणांत जे [ नेहेमीं हालणारे ] बारीक रेणु दिसतात त्यांस त्रसरेणु असें ह्मटलें आहे. ३६१ आठ त्रसरेणूंची एक लिक्षा, त्या तीन एकत्र केल्या ह्मणजे त्याला राजसंर्षप ह्म- णतात. तीन राजसर्षप ह्मणजे एक गौरसर्षप, सहा गौरसर्षप ह्मणजे एक मध्यम जातीचा. यव, तीन यव ह्मणजे ३६२ एक कृष्णल (गुंज), पांच कृष्णल ह्मणजे एक माप ( मासा), सोळा माष ह्म- णजे एक सुवर्ण, चार किंवा पांच सुवर्ण ह्मणजे एक पल, असे सांगितलेलें आहे. ३६३ दोन कृष्णल ह्मणजे एक रुप्याचा माष, सोळा माष ह्मणजे धरण, [ आणि ] दहा धरणांचें एक शतमान पल. चार सुवर्ण ह्मणजे एक निष्क. तांब्याचे पैशास कार्षिक [ ह्मणावें ]. उत्तम साहस (ह्मणजे अत्यंत मोठा ) दंड ह्मणजे एक हजार ऐशी पण. त्याचे अर्ध्याइतके दंडास मध्यम [ दंड ] आणि पुनः त्याचे अर्ध्याइतके दंडास अधम [ दंड ] ह्मणतात. धिग्दंड (ह्मणजे तुला धिक्कार असो अशा अर्थाचें भाषण शिक्षेचे ऐवजीं अपराध्यास बोलणें ), वाग्दंड (अपराध्यास कांहीं कठोर शब्द शिक्षेचे ऐवजी बोलणें ), धनदंड व वध [ इतक्या प्रकारचे दंड आहेत ]. अपराध्याचे स्वरूपाप्रमाणे ह्यांपैकी एक किंवा अधिक किंवा सर्व शिक्षा योजाव्या. शिक्षा देतांना अपराधाचें स्वरूप, देश, काल, बल, [ तसेंच ] वय, कर्म (अपराध्याची वर्तणूक ), आणि धन यांचा चांगला विचार करून शिक्षापात्र असतील त्यांस शिक्षा कराव्या. याज्ञवल्क्यकृत धर्मशास्त्राचा आचाराध्याय समाप्त.