पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/३५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आचाराध्याय. त्यांमध्ये पूर्व जन्मींच्या कृत्यांचें द्योतक पुरुषाचें दैव होय. कोणी दैवयोगापासून, कोणी साहजिक रीतीनें, कोणी कालांतराच्या योगापासून, कोणी पुरुषाच्या करामती- पासून, ३४९ कोणी कुशलबुद्धि वरील सर्व कारणांचे संयोगापासून, फलाची इच्छा करतात. एका चाकानें: जसा रथ चालू शकत नाहीं, ३५० तसें पुरुषाच्या यत्नावांचून केवळ एकटें दैव फलद्रूप होत नाहीं. पृथ्वीच्या किंवा सोन्याच्या लाभापेक्षां ज्या अर्थी मित्राचा लाभ होणे हे श्रेष्ठ आहे, ३५१ त्या अर्थी मित्रप्राप्ति होण्यासाठी [ पुरुषानें ] यत्न करावा. त्यानें अंतःकरण- बृत्ति चांगली राखून सत्य राखावें. राजा, मंत्री, प्रजा, किल्ला, जामदारखाना, सैन्य, ३१२. आणि स्नेही, या सांतांस राज्याची सात अंगें असें ह्मटलें आहे. याकरितां राज्य- प्राप्ति करून घेतल्यावर राजानें दुर्वृत्त पुरुषांस शिक्षा करावी.. ३५३ पूर्वी ब्रह्मदेवानें दंडरूपानें धर्मास उत्पन्न केलें, ह्मणून ज्याची बुद्धि स्थिर नाहीं ब. जो लोभी त्याचे हातून यथान्याय दंड (शिक्षा) होण्याचा संभव नाहीं.. ३५४. या कारणास्तव ज्याची प्रतिज्ञा तडीस जाते, जो निर्दोष, ज्यास योग्य साहाय्य आहे, आणि जो बुद्धिमान् पुरुष [ त्याचेच हातून यथान्याय शिक्षा होण्याचा संभव आहे ]. [ न्यायानें ] दंड केला तर त्यापासून देव, असुर, मनुष्य [ यांस ], [ आणि ] सर्व जगास आनंद होईल; परंतु तद्विरुद्ध केल्यास इतक्या सर्वांस सं- ताप होईल. राजानें अधर्माने दंड केल्यास त्याला स्वर्गप्राप्ति होणार नाहीं, होईल, व तो प्रजांस मुकेल. कीतींचा नाश ३.५६ यथान्याय दंड केल्यानें राजास स्वर्ग, कीर्ति आणि यश हीं प्राप्त होतात. जरी आपला भाऊ, पुत्र, पूज्य पुरुष, सासरा किंवा मातुळ असेल तरी,. ३५७ आपल्या धर्मास सोडून चालल्यास, राजानें त्यास दंड करावाच; राजास अदंड्य असा कोणी नाहीं. दंडास जे योग्य त्यांस जो राजा दंड करतो, व ज्यांचा वध करणे योग्य त्यांचा वध करतो, ३१८ [ अशा राजास] मोठी दक्षिणा देऊन परिपूर्ण केलेल्या अनेक यज्ञांचें पुण्य लागते. या गोष्टीचा विचार करून, ३१९ त्यानें वर्णानुक्रमानें सभ्य गृहस्थांची मदत घेऊन राज्याचे सर्व कारभार दररोज. स्वतः पहावे. निरनिराळीं कुळें (ब्राह्मणादिक ), जाती (संकीर्णजाती मूर्घावषिक्तादि ), श्रेणी ( दुकानदार वगैरे), गण (फिरते व्यापारी), आणि जानपद (कारागीर लोक), ३६० हे जर स्वधर्मास उल्लंघून चालतील तर त्यांस योग्य शासन करून त्यांस आपाप-